Advertisement

मुंबईत कोरोना वाढू नये म्हणून पालिकेच्या 'या' आहेत गाईडलाईन्स

मुंबईमध्ये कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी कोव्हिड संदर्भातील सूचनांचे पालन करावे, असं आवाहन देखील पालिकेकडून करण्यात आलं आहे.

मुंबईत कोरोना वाढू नये म्हणून पालिकेच्या 'या' आहेत गाईडलाईन्स
SHARES

जागतिक स्तरावर कोरोनाच्या (Corona Cases Updates) वाढत्या प्रादुर्भावानंतर राज्य सरकार देखील सतर्क झालं आहे. राज्याची राजधानी मुंबईत देखील या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगली जात आहे. मुंबई महापालिकेने एक प्रेस नोट जारी करत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष सूचना आणि गाईडलाइन्स जारी केल्या आहेत.

मुंबई महापालिकेनं कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी सूचना (Mumbai Corona Virus Updates Guideline of Bmc )देण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी कोव्हिड संदर्भातील सूचनांचे पालन करावे, असं आवाहन देखील पालिकेकडून करण्यात आलं आहे.

पालिकेच्या वॉर्ड वार रूम 24*7 पुन्हा कार्यरत

आता पुन्हा एकदा बीएमसीच्या वॉर्ड वार रूम 24*7 कार्यरत राहतील. नागरिक कोरोना संबंधी या वॉर रुमला संपर्क करू शकतील. मुंबई महापालिका कोरोना नियंत्रणमध्ये ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू ठेवणार आहे.

‘या’ आहेत पालिकेच्या विशेष सूचना

  • नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क लावावे
  • सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे
  • वेळोवेळी हात धुवावे, स्वच्छता बाळगावी
  • आजारी वाटल्यास किंवा लक्षणे जाणवल्यास घरी थांबावे
  • ज्येष्ठ नागरिक त्यासोबतच डायबिटीक किंवा हायपर टेन्शन रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
  • सर्व नागरिकांनी लसीकरण पूर्ण करून बूस्टर डोस घ्यावा.

पालिका पूर्ण सज्ज

मुंबई महापालिका मोठ्या प्रमाणावर लसीकरणावर लक्ष केंद्रित करत आहे. कोरोना रुग्णांसाठी विशेष रुग्णालय, बेड्स, ऑक्सिजन बेड्सची सोय केली जाईल. सध्या मुंबईत कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेचे सेव्हन हिल आणि कस्तुरबा रुग्णालय कार्यरत आहेत. तर कामा रुग्णलय, सेंट जॉर्ज रुग्णालय ,टाटा रुग्णालय, जगजीवन राम रुग्णालय हे राज्य सरकारी रुग्णालय व इतर खाजगी 26 रुग्णालयं हे कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आहेत, असं महापालिकेनं सांगितलं आहे.



हेही वाचा

COVID-19 In Mumbai: नवीन वर्ष साजरे करताना 'ही' खबरदारी घ्या

New COVID Variant BF.7: 'या' १० मुद्द्यांकडे दुर्लक्ष करू नका, वाचा पूर्ण गाईडलाईन्स

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा