Advertisement

COVID-19 In Mumbai: नवीन वर्ष साजरे करताना 'ही' खबरदारी घ्या

भारतातही रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे.

COVID-19 In Mumbai: नवीन वर्ष साजरे करताना 'ही' खबरदारी घ्या
SHARES

राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या कमी असली तरी चीन, जपान, ब्राझील आणि अमेरिकेत कोविड-19 च्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.

मात्र, भारतातही रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे. सणासुदीच्या काळात (ख्रिसमस आणि नवीन वर्ष) कोविड-संबंधित प्रोटोकॉलचे पालन करण्याचे डॉक्टर सुचवतात.

“स्वच्छता राखणे आणि मास्कचा वापर करण्याला अधिक प्राधान्य दिले पाहिजे. लसीकरणामुळे लोक आता कोविडला गांभीर्याने घेत नाहीत. परंतु, परदेशात वाढत्या केसेसमुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे," डॉ. मनीष पेंडसे, सल्लागार फिजिशियन, मेडिकोव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबई यांनी सांगितले.

तापमानात घट होत असतानाच चीनमध्ये कोविडचे रुग्ण वाढत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. जसजसा 31 डिसेंबर जवळ येतो तसतसे बरेच लोक सुट्टीचे नियोजन करतात. अशा वेळी गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्कचा वापर करावा. तसेच ज्यांनी बूस्टर डोस घेतलेला नाही त्यांनी ताबडतोब घ्यावा.

हात धुतल्याशिवाय तोंड, नाक, डोळे आणि कान यांना स्पर्श करू नका. जर तुम्ही वृद्ध आणि लहान मुलांसोबत प्रवास करत असाल तर शाल आणि उबदार कपडे घ्या. ताप, अंगदुखी, खोकला, डोकेदुखी, पोटदुखी यांसारख्या आजारांवर औषध घेऊन जा.

“अत्यावश्यक औषधे घेऊन जा, खासकरून जर तुम्ही लहान मुलांसोबत प्रवास करत असाल. प्रवास करताना मुलांना सर्दी आणि फ्लू होतो,” असे SRV हॉस्पिटलचे सल्लागार फिजिशियन डॉ. अजित शेट्टी म्हणाले.

लोकांना ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास यांसारखी लक्षणे आढळल्यास किंवा त्यांना मधुमेहासारखा आजार असल्यास किंवा न्यूमोनियासारख्या फुफ्फुसाचा आजार असल्यास प्रवास करण्यापूर्वी कोविड-19 ची चाचणी घेणे महत्त्वाचे आहे. ही चाचणी अधिकृत प्रयोगशाळांमध्ये करावी.

“ख्रिसमस आणि नवीन वर्षात मोठ्या संख्येने नागरिक व्यस्त असतात. पार्टी करताना रेस्टॉरंट आणि क्लब सारख्या गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. साजरे करताना आपला जीव धोक्यात येणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे डॉ. पेंडसे यांनी सांगितले.



हेही वाचा

New COVID Variant BF.7: 'या' १० मुद्द्यांकडे दुर्लक्ष करू नका, वाचा पूर्ण गाईडलाईन्स

राज्यात निर्बंध लागणार का? जाणून घ्या राज्य सरकार काय म्हणाले

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा