हा उन्हाळा सोसवेना

 Mumbai
हा उन्हाळा सोसवेना

मुंबई - मुंबईतून थंडी गायबच झाली आहे. त्यामुळे बदलत्या हवामानाचा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागत आहे. सर्दी, खोकल्यामुळे सगळे हैराण झाले आहेत, त्यामुळे डॉक्टरांकडच्या फेऱ्या वाढल्या आहेत. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे हा त्रास होत असल्याचं डॉ. सागर शेटे यांचं म्हणणं आहे.

ज्यांच्यात प्रतिकार शक्ती कमी आहे, अश्या व्यक्तींना वातावरणातील बदलांचा सामना करावा लागतो. याचाय सामना प्रामुख्याने लहान मुलांना आणि जेष्ठांना करावा लागतो. हवामानातील बदलाबरोबरच आपण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्येही बदल करतो. कडक उन्हात केलेले शीत पेयाचे सेवन हे शरिरास हानीकारक असते. शीतपेय, आईस्क्रीम, बर्फाचा गोळाच्या खाण्यामुळे पोटाचे विकार होतात. त्यामुळे उन्हाळ्यात शक्यतो उघड्यावरचे सरबत, बर्फाचे गोळे खाणं टाळणं योग्य ठरेल.

Loading Comments