Advertisement

सुईविनाच होणार लहान मुलांचं लसीकरण

मुंबईत १८ वर्षांवरील पात्र व्यक्तींना पहिल्या लशीच्या मात्रेचे प्रमाण ९९ टक्के आणि दुसऱ्या मात्रेचे लसीकरण ६० टक्क्यांवर गेले आहे.

सुईविनाच होणार लहान मुलांचं लसीकरण
SHARES

मुंबईत १८ वर्षांवरील पात्र व्यक्तींना पहिल्या लशीच्या मात्रेचे प्रमाण ९९ टक्के आणि दुसऱ्या मात्रेचे लसीकरण ६० टक्क्यांवर गेले आहे. त्याचवेळी केंद्र सरकारनं 'झायकोव्ह-डी' या कोरोना प्रतिबंधक लशीच्या मात्रा घेण्याचं ठरविलं आहे. महापालिकेनं ही १२ वर्षांखालील सुमारे १० लाख मुलांच्या लसीकरणाची जय्यत तयारी केली आहे. मुलांच्या लसीकरणासाठी महापालिकेकडून नियोजन हाती घेतलं जात आहे. लहान मुलांना लस देताना सुईचा वापर टाळला जाणार असून, त्याऐवजी 'जेट अॅप्लिकेटर'चा वापर केला जाणार आहे.

लसीकरणासाठी २८ दिवसांच्या अंतरानं ३ मात्रा दिल्या जाणार आहेत. त्या प्रत्येक मात्रेची किंमत ही केंद्र सरकारच्या निर्णयानुसार ३५८ रुपये इतकी असेल. तसंच, मुलांचे लसीकरण अधिक सुलभ व्हावे म्हणून लसीकरण केंद्रांवर विशेष बूथची व्यवस्था केली जाणार आहे. तसंच त्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

महापालिकेनं १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू केली असून, मुंबईकरांनी त्यास मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं आहे. सध्या कोरोना नियंत्रणात असल्यानं राज्य सरकार, महापालिकेनं अनेक निर्बंध कमी केले आहेत. त्याचप्रमाणे, १८ वर्षांवरील पात्र व्यक्तींच्या लसीकरणापाठोपाठ मुलांचे लसीकरण कधी होणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यासाठी पालिकेने नायर रुग्णालयात २ ते १८ वर्षांवरील १५ मुलांवर लशींची घेतलेली चाचणी यशस्वी ठरली आहे.

महापालिकेच्या लसीकरण मोहिमेतून एकूण १ कोटी ४२ लाख ६२ हजार ५१३ जणांना मात्रा दिली आहे. त्यात, ८८ लाख ९८ हजार ७५८ पहिली आणि ५३ लाख ६३ हजार ७५५ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा