Advertisement

लसीचे दोन्ही डोस घेऊनही अमोल कोल्हेंना कोरोनाची लागण

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमोल कोल्हे यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे.

लसीचे दोन्ही डोस घेऊनही अमोल कोल्हेंना कोरोनाची लागण
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमोल कोल्हे यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. सध्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेऊनही कोल्हे यांना कोरोना झाला आहे.

आपल्या ट्विटर हँडलवरून माहिती देताना अमोल कोल्हे यांनी असं सांगितलं की, कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही. गेल्या दोन दिवसांपासून मला कोरोना सदृश लक्षणे दिसत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसींचे दोनही डोस पूर्ण झाले आहेत. तरी टेस्ट केल्यानंतर माझा RT-PCR रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला आहे. परंतु प्रकृती स्थिर आहे.

हेही वाचा- जगभरात कुठेही कोरोना लसीच्या बुस्टर डोसची गरज नाही : WHO

डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत. मतदारसंघातील पूर्वनियोजित दौरा सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवाहन आहे की त्यांनी लक्षणे आढळून आल्यास टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावीत. निर्धारीत नियमांचं काटेकोर पालन करावं. 

दरम्यान एका कार्यक्रमात सीरम इन्स्टिट्युटचे संस्थापक अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी कोरोनाला अटकाव करण्यासाठी दोन लसी पुरेशा नसून बुस्टर डोसची आवश्यकता लागू शकेल असं म्हटलं होतं. अमेरिकेत तर तेथील नागरिकांना बुस्टर डोस देण्याची तयारी देखील सुरू झालेली आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेनं मात्र बुस्टर डोस देण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे.

मात्र दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेऊनही कोरोनाची लागण होत असल्याने वैद्यकीय क्षेत्रातून चिंता व्यक्त होत आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा