Advertisement

चिंतादायक! ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंट आढळला महाराष्ट्रात

ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंट महाराष्ट्रात आढळला आहे.

चिंतादायक! ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंट आढळला महाराष्ट्रात
(File Image)
SHARES

नवीन ओमिक्रॉन प्रकाराचे, BA.2.12.1,  रुग्ण यूएसमध्ये सर्वाधिक आधळून येत आहेत. चिंतादायक म्हणजे महाराष्ट्रात देखील या व्हेरिएंटचे रुग्ण आढळत आहेत.

मुंबईसह राज्यात कोविड-19 प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. शिवाय, अलीकडेच मुंबईत BA.4 असलेल्या तीन रुग्णांची आणि Omicron स्ट्रेनच्या BA.5 उप-प्रकारातील एक रुग्णाची नोंद करण्यात आली.

या परिस्थितीत, कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ होत असताना, महाराष्ट्र आरोग्य विभागाने जीनोम देखरेख आणि लसीकरण वाढवण्यावर भर दिला आहे.

दरम्यान, तज्ञांनी सांगितले की हे सांगणे खूप घाईचे आहे की हे इतर कोणत्याही प्रकार किंवा उप प्रकारापेक्षा जास्त धोकादायक आहे.

बुधवारी जाहीर झालेल्या कोरोना संसर्गाच्या अहवालानुसार, 24 तासांत संसर्गामुळे 15 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता देशात कोरोना संसर्गामुळे मृतांची संख्या 5,24,792 झाली आहे.

मात्र देशात झपाट्यानं वाढणाऱ्या कोरोना संसर्गाच्या दरानं पुन्हा एकदा आरोग्य विभागाची चिंता वाढवली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून देशातील कोरोनाचा वेग मंदावला होता. पुन्हा एकदा कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढू लागली आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागानुसार, मंगळवार, सोमवार, 13 जूननंतर 2,956 रुग्ण आढळले. 14 जून रोजी महाराष्ट्रात कमी म्हणजे 1,885 रुग्ण सापडले. मुंबईतही 1,118 वरून 1,724 प्रकरणे नोंदली गेली आहेत. राज्यातही चार मृत्यूची नोंद झाली आहे.



हेही वाचा

मुंबईतल्या 'या' विभागांमध्ये गॅस्ट्रो, मलेरियाचे रुग्ण सर्वाधिक

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा