Advertisement

अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर कॉस्मेटिक मागवणाऱ्यांनो सावधान!


अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर कॉस्मेटिक मागवणाऱ्यांनो सावधान!
SHARES

अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर दिल्या जातात. पण ग्राहकांनो अशा ऑफर्सना भुलून तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं. कारण अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या वेबसाईट तुमची घोर फसवणूक करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या वेबसाईटकडून बनावट सौंदर्य प्रसाधन अर्थात कॉस्मेटिक विकली जात असल्याचं म्हणत भारतीय औषध नियंत्रक मंडळा (डीसीजीआय)नं या वेबसाईटला नोटीस बजावल्या आहेत.


काही ठिकाणी छापेमारी

५ आणि ६ ऑक्टोबर रोजी डीसीजीआयकडून देशात काही ठिकाणी छापे मारण्यात आले. यावेळी विविध कंपन्याची कॉस्मेटिक बनावट असल्याचं समोर आलं. त्यानुसार या कंपन्याना डीसीजीआयनं अनेकदा नोटीस बजावल्या. याप्ररकणी अधिक चौकशी करण्यात आली असता या बनावट कॉस्मेटिकची विक्री अमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या वेबसाईटकडून केली जात असल्याचीही माहिती समोर आली.


डीसीजीआयने घेतली दखल

डीसीजीआयने या प्रकारणाची गंभीर दखल घेत आता या वेबसाईटनाही कारणे दाखवा नोटीसा वाजवल्या आहेत. १० दिवसांत या वेबसाईटला उत्तर देण्याचंही आदेश डीसीजीआयने दिले आहेत. या उत्तरानंतर पुढील कारवाई होणार आहे.

ऑनलाइन कंपन्यांवर कोणतंही सरकारी नियंत्रण नसल्यानं त्यांचं फावत आहे. त्यामुळे ग्राहकांनो अशा वेबसाईटच्या भूलथापांना बळी पडू नका आणि कॉस्मेटिक खरेदी करतना योग्य ती कळजी घ्या असं आवाहन महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी केलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा