Advertisement

मुंबईत साथीच्या आजारावरील उपचारांसाठी ५ हजार खाटांचं रुग्णालय बांधणार


मुंबईत साथीच्या आजारावरील उपचारांसाठी ५ हजार खाटांचं रुग्णालय बांधणार
SHARES

मुंबईत कोरोनासह साथीच्या आजारांनीही डोकं वर काढलं आहे. त्यामुळं या आजारावर उपचार करण्यासाठी व रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी ५ हजार खाटांचे विशेष रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयासाठी महापालिका जागेच्या शोधात आहे. मागील २ महिन्यांपासून महापालिका २० एकर जागेच्या शोधत असून, मुलुंड व भांडुप अशा २ जागांचा पर्याय समोर आला आहे. महापालिकेचे अधिकारी संबंधीत जागेची पाहणी करणार आहे.

या २ जागांपैकी महापालिका एका जागेची निवड करणार असल्याची माहिती मिळते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाटांची कमतरता जाणवत आहे. साथीच्या आजारावर उपचार करणारे १२५ खाटांचे कस्तुरबा रुग्णालय आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जम्बो फॅसिलिटी सेन्टर तात्काळ उभारण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत असे विशेष रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.

महापालिकेनं २० जुलै रोजी अभिरुची स्वारस्य मागवलं. परंतु, १० ऑगस्ट रोजी मुदत संपली तेव्हा केवळ एकच प्रतिसाद आल्याचं आढळून आल्याने निविदेला मुदतवाढ देण्यात आली आहे. यावेळेस, भांडुप व मुलुंड अशा २ जागांचा पर्याय महापालिकेपुढं आला आहे. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा