Advertisement

नाशिकच्या रुग्णालयातील ऑक्सिजन टँक लीक, २२ रुग्ण दगावले

नाशिक पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक झाल्याची घटना घडली आहे.

नाशिकच्या रुग्णालयातील ऑक्सिजन टँक लीक, २२ रुग्ण दगावले
SHARES

नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक (Oxygen Tank Leak) झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये २२ रुग्ण दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

ऑक्सिजन टँक लीक झाल्यानंतर रुग्णालयाच्या परिसरात एकच हाहाकार झाला आहे. ऑक्सिजन टँक लीक झाल्यानं सर्वत्र गॅस पसरल्याचं समजत आहे.

यामुळे ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तासाठी खंडीत झाला. २० KL क्षमतेची ऑक्सिजन टाकी लीक झाल्यानं परिसरात एकच गोंधळ उडाला. पालिकेच्या या रुग्णालयात १७१ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.

तर, ६७ रुग्णं व्हेंटिलेटर आणि अत्यवस्थ आहेत. या घटनेमध्ये काही रुग्ण दगावल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मात्र, ही घटना छोटी असल्याची प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope on Nashik Oxygen Leak) यांनी दिली आहे. सोबतच या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

या घटनेमध्ये ऑक्सिजनही वाया गेला नसल्याची माहिती, टोपे यांनी दिली आहे. स्थानिक प्रशासनानं याबद्दलची माहिती दिल्याचं टोपे यांनी सांगितलं.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा