Advertisement

वाडियातल्या बच्चेकंपनीने पोलिसांना बांधल्या राख्या!


वाडियातल्या बच्चेकंपनीने पोलिसांना बांधल्या राख्या!
SHARES

रक्षाबंधन हा खरंतर भाऊ-बहिणीचा सण. पण, या दिवशी पोलीस म्हणा किंवा डॉक्टर म्हणा, दोघंही आपली जबाबदारी निभावताना दिसतात. अशाच प्रकारे व्यस्त रहाणाऱ्या पोलिसांच्या जीवनात थोडासा आनंद देण्याचा प्रयत्न बाई जेरबाई वाडिया रुग्णालयाच्या विविध आजारांशी लढा देणाऱ्या मुलांनी केला आहे.

जवळपास 50 हून अधिक लहान मुला-मुलींनी यावेळी रक्षाबंधन हा सण साजरा केला. त्यांच्या या आनंदात मुंबईतील भोईवाडा पोलिसांनीही सहभाग घेतला. वाडिया रुग्णालयात कर्करोग, थालेसेमिया, किडनीचे आजार असलेल्या लहान मुलांनी यावेळी पोलिसांना राखी बांधली.

भोईवाडा पोलिस मुख्यालयाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद भोसले आणि महिला पोलिस रुचाली सकपाळ यांनी उपस्थिती दर्शवली.


रूग्णालयात आम्ही रूग्णांना वेगवेगळ्या आजारांपासून वाचविण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत झटत असतो. तर, दुसरीकडे आपल्या सगळ्यांच्याच सुरक्षेसाठी सदैव मुंबई पोलिस जबाबदारी निभावताना दिसतात. सण उत्सवाच्या वेळी डॉक्टर, पोलिस आपल्या जबाबदाऱ्या निभावत असतात. म्हणूनच, आम्ही या लहान रूग्णांद्वारे राखी बांधून समाजात एक वेगळा संदेश देण्याच्या प्रयत्न केला आहे.

डॉ. मिनी बोधनवाला, मुख्य कार्यकारी अधिकारी, बाई जेरबाई वाडिया रुग्णालय



हेही वाचा

यांच्या उत्साहाला तोड नाही!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा