Advertisement

कोरोनाग्रस्तांची नावे उघड, मनसे उपाध्यक्षाविरोधात गुन्हा

कोरोनाग्रस्त रुग्णांची (coronavirus) नाव उघड करु नयेत असे प्रशासनाचे सक्त आदेश आहेत. असं असूनही हे आदेश धाब्यावर बसवून रुग्णांची नाव उघड केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (mns) उपाध्यक्षांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कोरोनाग्रस्तांची नावे उघड, मनसे उपाध्यक्षाविरोधात गुन्हा
SHARES

कोरोनाग्रस्त रुग्णांची (coronavirus) नाव उघड करु नयेत असे प्रशासनाचे सक्त आदेश आहेत. असं असूनही हे आदेश धाब्यावर बसवून रुग्णांची नाव उघड केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (mns) उपाध्यक्षांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

कोरोना बाधित रुग्णांची (COVID-19) ओळख लपवण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे. कोरोनाच्या रुग्णांची नावं जाहीर करा, अशी मागणी मनसेने सरकारकडं केली आहे. जनजागृतीच्या दृष्टीनं ते अत्यंत आवश्यक असल्याचं मनसेचं म्हणणं आहे.

हेही वाचा- कोरोना रुग्णांची ओळख लपवू नका, नावं जाहीर करण्याची मनसेची मागणी

राज्यात कोरोनाबाधित (coronavirus patient) रुग्णांची संख्या वाढ असतना काही ठिकाणी कोरोनाबाधित आणि संशयित रुग्णांना बहिष्काराचा सामना करावा लागत असल्याच्या घटना पुढं आल्या आहेत. त्यामुळं कोरोनाबाधित रुग्णांना विलग करून त्यांच्यावर उपचार करताना त्यांची ओळखही लपवली जात आहे. मात्र, मनसेनं त्यास आक्षेप घेतला आहे.

मनसेची भूमिका

कोरोनाची लागण झालेले लोक हे कोणी गुन्हेगार नाहीत. त्यांना एचआयव्हीसारख्या रोगाची लागण झालेली नाही. अनावधानानं ते विषाणूच्या संपर्कात आलेले आहेत. त्यामुळं त्यांची ओळख लपवण्याचं कारण नाही. उलट त्यांची नावं जाहीर केल्यास त्यातून जनजागृती होईल. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही त्याची माहिती मिळेल व खबरदारी म्हणून ते स्वत:हून चाचण्या करण्यासाठी पुढं येतील, असं मत मनसेचे नेते संदीप देशपांडे (mns leader sandeep deshpande) यांनी व्यक्त केलं आहे. त्यातच मनसेच्या उपाध्यक्षांवर गुन्हा नोंदवण्यात आल्याने यावर मनसेची भूमिका काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 

काय आहे प्रकरण?

अहमदनगरच्या सिव्हिल रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ३ रुग्ण उपचार घेत होते. हे ३ रुग्ण अचानक कोणालाही न सांगता निघून गेले होते. या रुग्णांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या नावासह सरकारी कामासाठी एक पत्र तयार करण्यात होतं. दरम्यान, हे तिघेही पुन्हा रुग्णालयात दाखल झाले. मात्र, तोपर्यंत त्यांच्या नावाचं पत्र व्हायरलं झालं होतं.

हेही वाचा- Coronavirus Updates: मुंबई, उल्हासनगरमध्ये आणखी 2 रुग्ण

रुग्णालयाच्या एका कर्मचाऱ्याने याप्रकरणी तक्रार नोंदवल्यावर या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार, सायबर सेलने (cyber cell) केलेल्या तपासात पुण्यातील मनसेचे उपाध्यक्ष संजीव पाखरे यांनी ही नावं व्हायरल केल्याचं उघड झालं. त्यानुसार, पाखरे यांच्यावर आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यान्वये बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा