Advertisement

कोरोना रुग्णांची ओळख लपवू नका, नावं जाहीर करण्याची मनसेची मागणी

कोरोना बाधित रुग्णांची ओळख लपवण्यास आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे.

कोरोना रुग्णांची ओळख लपवू नका, नावं जाहीर करण्याची मनसेची मागणी
SHARES

कोरोना बाधित रुग्णांची ओळख लपवण्यास आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे. कोरोनाच्या रुग्णांची नावं जाहीर करा, अशी मागणी मनसेने सरकारकडं केली आहे. जनजागृतीच्या दृष्टीनं ते अत्यंत आवश्यक असल्याचं मनसेचं म्हणणं आहे.

राज्यात कोरोना संख्या ४२ वर पोहोचली आहे. काही ठिकाणी कोरोनाच्या ग्रस्तांना व संशयितांना बहिष्काराचा सामना करावा लागत असल्याच्या घटना पुढं आल्या आहेत. त्यामुळं करोना बाधित रुग्णांना विलग करून त्यांच्यावर उपचार करताना त्यांची ओळखही लपवली जात आहे. मात्र, मनसेनं त्यास आक्षेप घेतला आहे.

करोनाची लागण झालेले लोक हे कोणी गुन्हेगार नाहीत. त्यांना एचआयव्हीसारख्या रोगाची लागण झालेली नाही. अनावधानानं ते विषाणूच्या संपर्कात आलेले आहेत. त्यामुळं त्यांची ओळख लपवण्याचं कारण नाही. उलट त्यांची नावं जाहीर केल्यास त्यातून जनजागृती होईल. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही त्याची माहिती मिळेल व खबरदारी म्हणून ते स्वत:हून चाचण्या करण्यासाठी पुढं येतील, असं मत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केलं. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा