Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली कोरोनाची लस

दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस घेतल्याचं समोर आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली कोरोनाची लस
SHARES

कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा पार पडला असून सोमवारपासून तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. तिसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस घेतल्याचं समोर आले आहे. नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लसीचा पहिला डोस टोचून घेतला आहे.

याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे. 'कोरोना लसीचा पहिला डोस मी एम्स रुग्णालयात घेतला. कोरोना विरुद्धातील जागतिक लढाईला बळकट करण्यासाठी आपल्या डॉक्टरांनी आणि वैज्ञानिकांनी कसे कार्य केले, जे उल्लेखनीय आहे. मी लस घेण्यासाठी पात्र असलेल्या सर्वांना आवाहन करतो. एकजुटीने आपण भारत कोरोनामुक्त करुया!',असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी भारत बायोटेकची कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे. सर्वसामान्यांमध्ये लसीबाबत आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी मोदी आणि इतर नेते लस घेणार असल्याचं म्हटलं जात होतं. अखेर नरेंद्र मोदींनी कोरोनाची लस घेतली. मोदीनंतर आता देशातील अनेक बडे नेते जसे की गृहमंत्री अमित शहा, इतर राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि मंत्रिमंडळातील सदस्य लस घेणार आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा