Advertisement

रुग्णांची माहिती लीक करणं भोवलं


रुग्णांची माहिती लीक करणं भोवलं
SHARES

मुंबई - हेल्थ सोल्यूशन पॅथॉलॉजी या खासगी लॅबनं 40,000 हून अधिक रुग्णांच्या रक्त चाचण्यांसह इतर माहिती लिक केल्याची धक्कादायक माहिती 2 डिसेंबरला समोर आली होती. त्यानंतर रुग्णांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालंय. या माहितीचा दुरुपयोग होण्याची शक्यताही बळावली आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागानं लॅबला नोटीस बजावली होती. या नोटीसला लॅबनं उत्तर दिलंय. या उत्तराचा अभ्यास करत पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य विभागाच्या आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी ‘!मुंबई लाइव्ह’ला दिलीय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा