प्रकल्पामधून डेंग्यूबाबत जनजागृती


  • प्रकल्पामधून डेंग्यूबाबत जनजागृती
SHARE

गोरेगाव - डेंग्यूच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी पालिकेकडूूून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. गोरेगाव येथील पी विभागीय कार्यालयात प्रोजेक्टमधून बनवलेल्या चित्रातून डेंग्यूबाबत जनजागृती करण्यात येत आहे. डेंग्यूबाबत जनजागृती करण्यासाठी बचत गटातील महिलांनी हा प्रकल्प तयार केला आहे.

योग्य काळजी न घेतल्याने वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना डेंग्यू कसा होतो. याचे प्रात्यक्षिक चित्रे तयार करून दाखवले आहे. या प्रकल्पात घरातील टाकी, टायर ,अडगळीची भांडी, बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या होऊ शकतात. त्यापासून कशी काळजी घ्यायची याची माहिती या प्रकल्पातून दिली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या