Advertisement

रेल्वे स्थानकात कोरोना चाचणी; पूर्वसूचना नसल्यानं प्रवाशांची गैरसोय

मुंबईतील रेल्वे स्थानकात कोरोना चाचणी केली जात आहे. परंतु, या चाचणीबाबत पूर्वसुचना नसल्यानं प्रवाशांची गैरसोय होत असल्याचं निदर्शनास आलं.

रेल्वे स्थानकात कोरोना चाचणी; पूर्वसूचना नसल्यानं प्रवाशांची गैरसोय
SHARES

दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आल्यानं मुंबईसह राज्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिका व राज्य सरकारनं कंबर कसली आहे. राज्यात कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात असला तरी, मागील काही दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा वाढतो आहे. त्यामुळं वेळीच खबरदारी घेऊन राज्य सरकारनं नागरिकांच्या सुरक्षेसाठी व कोरोनाला आळा घालण्यासाठी बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याच निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मुंबईतील रेल्वे स्थानकात कोरोना चाचणी केली जात आहे. परंतु, या चाचणीबाबत पूर्वसुचना नसल्यानं प्रवाशांची गैरसोय होत असल्याचं निदर्शनास आलं.

मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं मुंबईतील रेल्वेच्या स्टेशनवरही तपासणी सुरू केल्याचं त्यांनी म्हटलं. त्यानुसार, परराज्यांतून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या बोरिवली, दादर, वांद्रे, कुर्ला, मुंबई सेंट्रल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं थांबतात. त्यामुळं या ६ रेल्वे स्थानकांमध्ये पालिका कर्मचाऱ्यांची पथकं तैनात करण्यात येणार आहेत.

बुधवारी सकाळी ६ वाजल्यापासून पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकात बाहेरील राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्यास सुरूवात केली. परंतु, या चाचणी वेळी अनेक प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. सोमवारी राज्य सरकारनं दिल्ली, गुजरात, गोवा, राजस्थान येथून महाराष्ट्रात रेल्वे, विमानमार्गे येणाऱ्या प्रवाशांच्या कोरोना तपासणीची करणयाचा निर्णय घेतला.

त्यानुसार स्थानकांमध्ये कोरोना चाचणीची व्यवस्था केली जात आहे. पश्चिम रेल्वेवरून मुंबई सेन्ट्रल, वांद्रे टर्मिनस, दादर इथं ४० गाड्या राज्याबाहेरून येतात. मुंबईत ४ राज्यातून दाखल होणाऱ्या प्रवाशांचा अहवाल पाहणी आणि तपासणीसाठी ६ मुख्य रेल्वे स्थानकांवर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची पथकं तैनात करण्यात येणार आहेत. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा