Advertisement

चिनी किटमधून निष्कर्ष चुकीचे, मुंबईत रॅपिड टेस्ट थांबवल्या

दोन दिवस या किटची प्रत्यक्ष तपासणी, चाचणी केल्यानंतर पुढे निर्णय घेतला जाईल.

चिनी किटमधून निष्कर्ष चुकीचे, मुंबईत रॅपिड टेस्ट थांबवल्या
SHARES

कोविड-१९च्या चाचणीसाठी चीनहून मागवलेल्या रॅपिड टेस्ट किटचा वापर करण्यासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. बंदी घातली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं मुंबईसह इतर राज्यांमध्ये तुर्तास तरी या रॅपिड किटवर बंदी घातली आहे.

राजस्थानात याद्वारे ९५% पर्यंत चुकीचे निष्कर्ष आले होते. आयसीएमआरच्या ८ संस्थांतील पथके दोन दिवस या किटची प्रत्यक्ष तपासणी, चाचणी करतील. यात हे किट खराब आढळले तर त्यांना परत पाठवण्यात येईल. आयसीएमआरनं चीनच्या गुआंगझू वाँडफो बायोटेक आणि जुहाई लिवजोन डायग्नोस्टिक्स या दोन कंपन्यांकडून ५ लाख किट मागवले होते.

आयसीएमआरचे मुख्य संशोधक डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितलं की, किटमध्ये गडबड असल्याची माहिती आम्हाला तीन राज्यांकडून मिळाली. त्यांच्या निष्कर्षात खूप फरक पडला. काही ठिकाणी तर ६ ते ७१% पर्यंत आहे. त्यामुळे दोन दिवस या किटचा वापर करू नये, असं राज्यांना सांगण्यात आलं आहे. आयसीएमआरनं खराब किट पाठल्याचा आरोप सर्वप्रथम प. बंगालनं केला होता.

महाराष्ट्रात कोरोनाच्या चाचण्या आयसीएमआरच्या प्रोटोकॉलनुसार केल्या जात आहेत. केंद्र सरकारनं काही निकष लावून राज्याला रॅपिड टेस्ट करण्यास मान्यता दिली होती. त्यानुसार राज्यात ७५ हजार चाचण्या केल्या जातील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली होती. पण किटमधल्या गडबडीमुळे याचा वापर दोन दिवस थांबवण्यात आला आहे.

चीननं एखाद्या देशात सदोष किट पाठवण्याची ही पहिली वेळ नाही. २६ मार्च रोजी स्पेननंही चीननं पाठवलेल्या किट निकृष्ट दर्जाच्या असल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं. या किटच्या मदतीनं शेकडो हजारो चाचण्या केल्या आहेत, परंतु जवळजवळ  ६० हजार रुग्णांना COVID 19 पॉझिटिव्ह आहे की नाही हे अचूकपणे कळू शकले नाही. यापूर्वीही तुर्कीनं चिनी कंपन्यांकडून खरेदी केलेल्या टेस्टिंग किटबाबत असाच आरोप केला होता.



हेही वाचा

मुंबईत हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या वाटणार, फक्त यांनाच?

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा