Advertisement

मुंबईत हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या वाटणार, फक्त यांनाच?

मुंबईत काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या (hydroxychloroquine tablet distributes in mumbai) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईत हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या वाटणार, फक्त यांनाच?
SHARES

महाराष्ट्रात कोरोनाच्या (coronavirus) चाचण्या इंडियन काऊंन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या प्रोटोकॉलनुसार करण्यात येणार असून मुंबईत काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या (hydroxychloroquine tablet distributes in mumbai) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु या गोळ्या मुंबईतील काही ठराविक भागात आणि ठराविक लाेकांनाच देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांनी दिली.

आयसीएमआरच्या सूचनांचं पालन

राजेश टोपे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, राज्यात कोरोना (covid-19 patient,) रुग्णांची संख्या वाढतेय कारण राज्यात सर्वाधिक चाचण्या केल्या आहेत. त्यासाठी आयसीएमआरच्या (ICMR) सूचना कटाक्षाने पाळल्या जात आहेत. त्याचबरोबर घरोघर जाऊन नागरिकांचं आरोग्य सर्वेक्षण देखील केलं जात आहे. त्यासाठी ६३५९ पथके कार्यरत आहेत. कुठलीही तडजोड न करता सर्वेक्षण केलं जात आहे.

हेही वाचा- मुंबईत ३०३२ कोरोना रुग्ण, महाराष्ट्रात आढळले ४६६ नवे रुग्ण

गोळ्या वाटणार 

हायड्रोक्लोरोक्विनमुळे प्रतिबंधात्मक (immunity power) शक्ती वाढते म्हणून मुंबईत काही भागात हायड्रोक्लोरोक्विनच्या गोळ्या वाटपासाठी मान्यता देण्यात आली आहे. मात्र ज्यांना हृदयविकार आहे किंवा ६० वर्षांवरील आणि १५ वर्षाखालील व्यक्तींना या गोळा दिल्या जाणार नाहीत.

दुपटीचा वेग मंदावतोय

राज्याचा कोरोना रुग्ण दुपटीचा वेग हा मंदावत असून सुरूवातीला दोन दिवसांवर असणारा हा दर आता सुमारे ७ दिवसांवर गेला आहे. हा दर २० ते २५ दिवसांवर यावा तेव्हाच काहीशी समाधानाची बाब मानता येईल.

काही छोट्या चाचण्या देखील करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामध्ये एक्स रे चाचणी तसेच एसपीओटू पल्सऑक्सिमीटर चाचणी करण्यावर भर दिला जाणार आहे.

ज्या जिल्ह्यात १५ हून अधिक रुग्ण आहेत तो जिल्हा रोड झोन तर १४ दिवसांमध्ये नव्याने एकही रुग्ण वाढला नाही अशा जिल्ह्याला ऑरेंज झोन आणि २८ दिवस नव्याने एकही रुग्ण आढळून आला नाही तो ग्रीन झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

हेही वाचा- रॅपिड टेस्ट करण्यास केंद्र सरकारची परवानगी

कोरोना उपचारासाठी असलेल्या रुग्णालयांमध्ये आता ऑक्सिजन स्टेशन करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक खाटेजवळ ऑक्सिजन मास्क आणि त्याला ऑक्सिजनचा पुरवठा करणारी व्यवस्था उभारण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना आवश्यकता वाटल्यास त्याचा वापर केला जाईल. मेडीकल ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ नये म्हणून त्याच्या उत्पादकांना सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली.   


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा