Advertisement

मुंबईत ३०३२ कोरोना रुग्ण, महाराष्ट्रात आढळले ४६६ नवे रुग्ण

मुंबईत coronavirus रुग्णांचा आकडा ३ हजारच्या वर गेला आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे.

मुंबईत ३०३२ कोरोना रुग्ण, महाराष्ट्रात आढळले ४६६ नवे रुग्ण
SHARES

२० एप्रिल, २०२० रोजी आरोग्य मंत्रालयानं (Health Department) दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात (Maharashtra)  ४६६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आता महाराष्ट्रातील कोरोना (Coronavirus Lockdown 2.0) रुग्णांचा आकडा ४ हजार ६६६ वर गेला आहे. शिवाय सोमवारी कोरोनामुळे ९ मत्यूंची नोंद झाली असून मतांचा आकडा २३२ वर गेला आहे. दिलासादायक म्हणजे फक्त ५७२ रुग्ण बरे झाले आहेत.

मुंबईत (Mumbai) देखील रुग्णांच्या आकड्यामध्ये वाढ झाली आहे. मुंबईत COVID 19 रुग्णांचा आकडा ३ हजारच्या वर गेला आहे. सध्या मुंबईत कोरोनाचे ३ हजार ०३२ रुग्ण झाले आहेत. तर मुंबईतीला मृतांचा आकडा १३९ च्या घरात गेला आहे. महाराष्ट्रातील रुग्णांपैकी अधिक रुग्ण हे मुंबईतलेच आहेत. त्यामुळे मुंबईसाठी ही नक्कीच चिंतेची बाब आहे.

सोमवारी धारावी (Dharavi) झोपडपट्ट्यांमध्ये ३० नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धारावीत एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा १६८ च्या घरात गेला आहे. तर आतापर्यंत ११ जणांचा बळी कोरोनानं घेतला आहे. शिवाय, महापालिकेच्या (BMC) आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या दोन कर्मचार्‍यांची देखील चाचणी सकारात्मक आली आहे. त्यामुळे संपूर्ण बीएमसी कार्यालय सील करण्यात आलं आहे.

याशिवाय मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन करून घेतलं आहे. कारण त्या कोरोना झालेल्या पत्रकारांच्या संपर्कात आल्या होत्या. सोमवारी जवळपास ५३ पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं बोललं जात आहे. तर काही पत्रकारांना होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला आहे. या सर्व पत्रकारांना सध्या एका जागी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.



हेही वाचा : 

Coronavirus Update: कोरोना विशेष रुग्णालयांची संख्या दुप्पट; ६६६० खाटांची उपलब्धता- राजेश टोपे


कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबईतील पालिका अधिकाऱ्यांनी आणखी काही कंटेंटमेंट झोन शोधले आहेत. शहरातील ७२१ ठिकाणं सील करण्यात आली आहेत. याशिवाय संपूर्ण मीरा-भाईंदर नगरपालिका ४ दिवस लॉकडाऊन पाळेल.


२० एप्रिलचा कोरोना रुग्णांचा आकडा खालीलप्रमाणे आहे.

मुंबई 3032

कल्याण-डोंबिवली 84

नवी मुंबई 83

ठाणे 154

वसई विरार 107

उल्हासनगर 1

पनवेल 33

पुणे 594

पिंपरी 51

पुणे ग्रामीण 18

नागपूर 69

अहमदनगर 29

रत्नागिरी 7

औरंगाबाद 30

यवतमाळ 15

सांगली 27

सातारा 13

उस्मानाबाद 3

कोल्हापूर 08

जळगाव 03

बुलढाणा 21

गोंदिया.

नाशिक 10

पालघर 17

वाशिम १

अमरावती 6

लातूर 8

हिंगोली 1

जालना १

मीरा भाईंदर 78

अकोला 16

मालेगाव 85

बीड 1

सिंधुदुर्ग १

धुळे.

भिवंडी 3

रायगड 15

सोलापूर 21

चंद्रपूर 2

प्रभणी.

नंदुरबार १

इतर राज्ये 13



हेही वाचा

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर झाल्या होम क्वारंटाईन

पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील दोघांना कोरोना


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा