Advertisement

coronavirus update: कोरोना विशेष रुग्णालयांची संख्या दुप्पट; ६६६० खाटांची उपलब्धता- राजेश टोपे

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी २५ विशेष रुग्णालयांची भर पडली आहे. यामुळे कोरोना विशेष रुग्णालयांची संख्या वाढून ५५ वर गेली आहे. राज्यात यामुळे ६६६० खाटा उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

coronavirus update: कोरोना विशेष रुग्णालयांची संख्या दुप्पट; ६६६० खाटांची उपलब्धता- राजेश टोपे
SHARES

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी २५ विशेष रुग्णालयांची भर पडली आहे. यामुळे कोरोना विशेष रुग्णालयांची संख्या वाढून ५५ वर गेली आहे. राज्यात यामुळे ६६६० खाटा उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषित केली होती. त्यानंतर आरोग्य विभागाने नव्याने ८ रुग्णालये तर वैद्यकीय शिक्षण विभागाने १७ रुग्णालये अधिसूचित केली आहेत. त्यामुळे अतिरिक्त ४३५५ खाटांची उपलब्धता झाली आहे. पूर्वी घोषित केलेल्या ३० रुग्णालयातील २३०५ खाटा आणि आताच्या ४३५५ खाटा अशा राज्यात एकूण ६६६० खाटा कोरोनाबाधीतांच्या उपचारासाठी उपलब्ध आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

हेही वाचा- दिलासा! रेड झोननधील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

दोन्ही विभागांनी काढलेल्या अधिसूचनांमुळे या रुग्णालयांना संशयित आणि कोरोना निदान झालेल्या रुग्णांना केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करणे बंधनकारक असणार आहे. राज्य शासनामार्फत कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये घोषित करण्यात आली असून त्यासाठी आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांनी अधिसूचना काढली आहे, असंही आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी सांगितलं. 

आरोग्य विभागाने ३१ मार्च रोजी काढलेल्या अधिसुचनेनुसार विभागाच्या अखत्यारीतील ३० रुग्णालये विशेष उपचारासाठी घोषित केले होते. त्यानंतर पुन्हा ६ एप्रिल रोजी ठाणे जिल्हा रुग्णालय, उल्हासनगर रुग्णालय क्र.४, पालघर ग्रामीण रुग्णालय, नंदुरबार, जालना, बीड आणि नांदेड जिल्हा रुग्णालय आणि मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालय अधिसूचित झाल्याने त्यामधील एकूण ६३० खाटांची उपलब्धता झाली आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पुणे, बारामती, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, यवतमाळ, अकोला, गोंदिया, चंद्रपूर, धुळे, लातूर, नांदेड, मिरज, औरंगाबाद, जळगाव आणि अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालये अधिसूचित केली आहे. त्यामुळे एकूण ३७२५ खाटा कोरोनाबाधितांसाठी उपलब्ध झाल्या आहेत.

हेही वाचा- मुंबई डॉकयार्डवर 21 नौसैनिकांना कोरोनाची लागण


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा