Advertisement

दिलासा! रेड झोननधील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

मुंबईत कोरोनानं थैमान घातलं आहे. राज्यातील सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. अशा परिस्थितीत एक दिलासादायक बातमी आहे.

दिलासा! रेड झोननधील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट
SHARES

मुंबईत कोरोनानं थैमान घातलं आहे. राज्यातील सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. अशा परिस्थितीत  एक दिलासादायक बातमी आहे. मुंबईतील रेड झोन परिसरात रुग्णांची संख्या घटली आहे. वरळी विभागात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याचं दिसून आलं आहे.  सलग चार दिवस रुग्ण संख्येत घट होत आहे.

वरळीत कोरोना रुग्णांची संख्या 389 आहे. मात्र, गेले चार दिवस रुग्णसंख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे. 14 एप्रिल रोजी या भागात 52 रुग्ण आढळले होते. त्यानंतर 15 एप्रिलला 27, 16 एप्रिलला 11 आणि 17 एप्रिल म्हणजे आज 9 रुग्ण आढळले आहे. याचा अर्थ असा की, या परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे.

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी  77 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर पाच जण दगावले आहेत. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2120 झाली आहे. त्याचबरोबर 201 संशयित रुग्ण विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. देशात कोरोना वाढण्याचं प्रमाणही 40 टक्क्यांनी घटलं आहे. देशभरात आतापर्यंत 13.6 टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर 80 टक्के कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरं होण्याचा मार्गावर आहेत.



हेही वाचा -

येत्या २० एप्रिलपासून टोल वसूली सुरु होणार

मुलांसोबत 'ती' ८५ किलोमीटर अनवाणी चालली, २५ दिवसात गाठली मुंबई




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा