Advertisement

मुलांसोबत 'ती' ८५ किलोमीटर अनवाणी चालली, २५ दिवसात गाठली मुंबई

दुसरा कुठलाच पर्याय नसल्यानं आरती तिच्या दोन मुलांसह तळोजाहून विरारच्या दिशेनं चालत निघाली.

मुलांसोबत 'ती' ८५ किलोमीटर अनवाणी चालली, २५ दिवसात गाठली मुंबई
SHARES

भारतात कोरोनाव्हायरसमुळे लॉकडाउन जाहीर होताच सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं.  विशेषत: रोजंदारीवरील कामगारांच्या चिंतेत यामुले अधिक भर पडली. लॉकडाऊनमुळे ट्रेन, एक्स्प्रेस, बस या सर्व सेवा बंद करण्यात आल्या. कोणताही पर्याय न उरल्यानं अनेक मजदूर शेकडो किलोमीटर चालत आपल्या गावी जाण्यास निघाले. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिलेची माहिती देणार आहोत. जी विरारला राहणारी आहे.

टाईम्स ऑफ इंडियानं (टीओआय) दिलेल्या वृत्तानुसार, एका दैनंदिन वेतन कामगाराची पत्नी, आरती घोड २१ मार्च रोजी प्रलोय आणि शिवम या दोन मुलांना आणण्यासठी तळोजा इथं गेली होती. मात्र, ती पोहोचल्यानंतर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे तिची परतीची ट्रेन चुकली. तिच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नसल्यानं आरती तिच्या दोन मुलांसह तळोजाहून विरारच्या दिशेनं चालत निघाली.

जगण्यासाठी त्यांनी पैसे, अन्न आणि निवारा मागितला. पण कुणी त्यांची मदत केली नाही. अखेर २२ मार्च ते १३ एप्रिल, २०२० या कालावधीत २५ दिवस चालून त्यांनी ८४ किलोमीटर अंतर कापलं आणि मुंबईगाठली. तिच्या नवऱ्याला आरती कुठे आहे याची जराही माहिती नव्हती. कारण कुणाची मदत न मिळाल्यानं ती नवऱ्याला कळवूच शकली नाही. आरतीनं कसबसं गोरेगाव गाठलं. गोरेगावला पोहोचताच तिनं एकाकडे मदत मागितली. त्या व्यक्तीनं तिला नवऱ्याशी संपर्क करण्यास मदत केली. 

 आरतीच्या नवऱ्याला याबद्दल कळातच तो विवारहून गोरेगावच्या दिशेनं चालत निघाला. १४ एप्रिलला तो गोरेगावला पोहोचला. गोरेगावला आरती आणि दोन मुलांना घेऊन तो पुन्हा विवारच्या दिशेनं चालत निघाला. तेव्हा वसई येथील रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना रेल्वे ट्रॅकवर पकडलं. जेव्हा रेल्वे पोलिसांना या कुटुंबाचा संघर्ष कळाला तेव्हा समाधान फाऊंडेशनच्या मदतीनं त्यांना खायला दिलं गेलं आणि सुरक्षितपणे घरी देखील पोहोचवलं.

आरतीचा नवरा अशोक एकूण ४८ कि.मी. चालला. तर आरती तिच्या दोन मुलांसोबत ८५ किमी चालली. एवढा प्रवास आरतीनं अनवाणी केला. कारण तिची चप्पल अर्ध्या रस्त्यातच तुटली.




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा