Advertisement

रिलायन्सकडून मुंबईत ८७५ नवे बेड्स उपलब्ध, इथल्या केंद्रामध्ये आहे रुग्णांसाठी जागा

रिलायन्स फाऊंडेशनकडून मुंबईत ८७५ बेडस् नवे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

रिलायन्सकडून मुंबईत ८७५ नवे बेड्स उपलब्ध, इथल्या केंद्रामध्ये आहे रुग्णांसाठी जागा
SHARES

अनेक सामाजिक संस्था मदतीसाठी पुढं येऊ लागल्या आहेत. रिलायन्स फाऊंडेशनकडून मुंबईत ८७५ बेडस् नवे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. एच एन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये ६००, वरळतील एनएससीआय मध्ये १००, सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये ४५ आयसीयुसह १२५ बेडस् तर ट्रायडंट, बिकेसी इथं १०० बेड्सची नव्यानं उपलब्धता करुन देण्यात आली आहे.

माहितीनुसार, वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियामध्ये कोविड रुग्णांसाठी असलेली ६५० बेड्सची सुविधा रिलायन्स फाउंडेशनच्या वतीनं चालवण्यात येणार आहे. सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय कोरोना रुग्णांसाठींच्या एकूण ६५० खाटांचे परिचलन आणि व्यवस्थापन करेल. याशिवाय अधिकच्या १०० ICU बेड्सची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे.

१५ मेपासून हे बेड्सच उपलब्ध होतील, अशी माहिती आहे. रिलायंस फाऊंडेशनकडून ५०० हून अधिक वैद्यकीय फ्रंटलायनर्स यामध्ये डॉक्टर, नर्स, नॉन मेडिकल स्टाफ यांना सुविधांच्या देखभालीसाठी नेमण्यात आलं आहे. ICU बेड, क्वारंटाइन वॉर्ड, व्हेंटिलेटर्स, सगळ्या आरोग्य सुविधांची जबाबदारी रिलायन्स फाउंडेशन करणार आहे.

गेल्या वर्षीसुद्धा फाउंडेशनच्या वतीनं मुंबई महापालिकेला सहकार्य म्हणून सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांसाठी खास २२५ बेड्सची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये १०० बेड्स आणि २० ICU बेड्सची जबाबदारी उचलली होती.

यावर्षीही सेव्हन हिल्स हॉस्पिटल आणि NSCI इथल्या कोविड सेंटरमधल्या सर्व कोविड रुग्णांना रिलायन्सच्या वतीनं मोफत उपचार देण्यात येणार आहेत, अशी माहिती फाऊंडेशनकडून देण्यात आली आहे. एनएससीआय आणि सेव्हन हिल्स रुग्णालयातील सर्व कोरोना रुग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार केले जातील.Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा