Advertisement

रिलायन्सने फक्त २ आठवड्यांत उभारलं कोरोना पेशंटसाठी हॉस्पिटल

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स उद्योग समुहाने 2 आठवड्यांत १०० बेडची क्षमता असलेलं देशातील पहिलं कोरोना समर्पित रुग्णालय उभारलं आहे.

रिलायन्सने फक्त २ आठवड्यांत उभारलं कोरोना पेशंटसाठी हॉस्पिटल
SHARES
 मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स उद्योग समुहाने 2 आठवड्यांत १०० बेडची क्षमता असलेलं देशातील पहिलं कोरोना समर्पित रुग्णालय उभारलं आहे. सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनने मुंबई महापालिकेच्या मदतीने मुंबईच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात १०० बेडची क्षमता असलेलं केंद्र सुरू केलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर इथे उपचार केले जाणार आहेत. कंपनीने पत्रकाद्वारे याची माहिती दिली आहे.

देशातील हे कोरोना समर्पित पहिलं केंद्र आहे. याचा सर्व खर्च रिलायन्सकडून केला जाणार आहे. या केंद्रावर निगेटिव्ह प्रेशर रुम तयार करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे करोनाचा संसर्ग होणार नाही आणि बाधितांची संख्या रोखण्यास मदत होईल. सर्व बेड हे आवश्यक साहित्यांसह उपलब्ध आहेत. व्हेंटिलेटर्स, पेसमेकर्स, डायलॅसिस मशिन आणि पेशंट मॉनिटरिंग साहित्यही उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.


परदेशातून आलेल्या व्यक्तींना कॉरेंटाईनमध्ये ठेवलं जात आहे. यासाठी सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन विशेष वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. यामुळे विलगीकरणासाठी आवश्यक असलेल्या सुविधा तातडीने मिळतील आणि रुग्णांवर चांगल्या पद्धतीने उपचार केले जातील, असं रिलायन्सकडून सांगण्यात आलं आहे.


रिलायन्स लाईफ सायन्सकडून करोनाची चाचणीसाठी आवश्यक किट्स आणि साहित्य आयात केली जात आहेत. रिलायन्सचे डॉक्टर आणि संशोधक ओव्हर टाइम करुन या जीवघेण्या व्हायरसविरोधात लढा देत आहेत, अशी माहिती कंपनीने दिली. रिलायन्स प्रति दिन १० लाख मास्क निर्मिती करण्याची तयारी करत आहे. यासोबतच खाजगी सुरक्षा साहित्य निर्मिती करण्यावरही भर दिला जात आहे. कोरोना  व्हायरसविरोधात दोन हात करत असलेल्या डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक कपडेही उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

हेही वाचा -

१०वी-१२वीच्या उत्तरपत्रिका शिक्षक घरीच तपासणार

Corona Virus : जे.जे.तील कोरोनाच्या चाचणी व उपचारासाठी तयारी पूर्ण





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा