मुंबईतील (mumbai) परळमधील व्यसनमुक्ती केंद्राने या वर्षी तरुणांमध्ये व्यसनमुक्तीच्या (youth Addiction) प्रकरणांमध्ये लक्षणीय 15 ते 20 टक्क्यांपर्यंत लक्षणीय वाढ नोंदवली आहे. व्यसनाधीन झालेले बहुतेक रुग्ण 18 ते 30 वयोगटातील तरुण आहेत. यामुळे तरुणांच्या मानसिक आरोग्याची चिंता वाढली आहे. अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या तरुणांची संख्या वाढत आहे. यासंबंधीचा सविस्तर अहवाल फ्री प्रेस जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.
नोंद केलेल्या माहितीनुसार असे दिसून येते की, व्यसनमुक्ती केंद्रात तरुणांचा आकडा मोठा आहे. तसेच 18 ते 30 वयोगटातील 75 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. यात 31-45 वयोगटातील 47 रुग्ण, 18 वर्षांखालील 9 रुग्ण आणि 46 ते 60 वयोगटातील 7 रुग्णांचा समावेश आहे.
केंद्रातील वरिष्ठ मनोचिकित्सकांनी तरुणांद्वारे वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये बदल झाल्याचे नमूद केले आहे. पूर्वी व्यसनाच्या प्रकरणांमध्ये प्रामुख्याने गांजा, तंबाखू, झोपेच्या गोळ्या, खोकला सिरप आणि अल्कोहोल (alcohol) यासारख्या पदार्थांचा समावेश होता. आता मात्र, एमडीएमएसारख्या अंमली पदार्थांचा वापर सामान्य झाला आहे.
गेल्या वर्षी या व्यसनमुक्ती केंद्रात 45 नवीन खाटा बसवल्या आहेत. परिणामी सुमारे 1,000 ते 1,200 नवीन रुग्णांना सेवा देण्याची या केेंद्राची वार्षिक क्षमता आहे. अल्कोहोल व्यसन ही सर्वात सामान्य समस्या आहे. जवळजवळ 70% प्रकरणे ही अल्कोहोल व्यसनाची आहेत.
2023 मध्ये, 680 रुग्णांनी अल्कोहोल व्यसनापासून सुटका करण्यासाठी उपचार घेतले होते. तर आणखी 270 रुग्णांनी गांजा, ब्राऊन शुगर तसेच इतर पदार्थांच्या व्यसनमुक्तीसाठी उपचार घेतले होते.
डॉक्टरांनी दबाव, तणाव, नातेसंबंधातील समस्या, शैक्षणिक आव्हाने आणि माध्यमांचा प्रभाव ही तरुणांची व्यसनाधीन होण्याची कारणे सांगितली आहेत. ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, चित्रपट आणि जाहिरातींमध्ये अंमली पदार्थांचा प्रचार तरुण मनांवर प्रभाव टाकते.
त्यामुळे हे कमी करण्यासाठी शिक्षण आणि जागरूकता उपक्रमांद्वारे या घटकांचे निराकरण करणे गरजेचे आहे.
हेही वाचा