Advertisement

कर्करोगग्रस्त बालरुग्णांसाठी निवासी व्यवस्था


कर्करोगग्रस्त बालरुग्णांसाठी निवासी व्यवस्था
SHARES

कॉटन ग्रीन - कॅन्सरग्रस्त बालरुग्णांसाठी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कॉटन ग्रीन (पू.) येथील राजसनगर बीपीटी वसाहतीतल्या 3 इमारतींमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी उत्तम आरोग्य, सुंदर वातावरण आणि खेळण्याची सोय देखील आहे. ही व्यवस्था बालरुग्णांसाठी करून देणे हा विषय अतिशय संवेदनशील होता, अशी प्रतिक्रिया केंद्रीय रस्ते वाहतूक आणि नौकायन मंत्री नितिन गडकरी यांनी गुरुवारी इमारतींच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान व्यक्त केले.

स्थानिकांच्या मागणीनुसार लवकरच पादचारी पुलाची व्यवस्था आणि रुग्णालयाला तीन इमारतींची व्यवस्था करून देण्यात आली असली तरी रुग्णालयाच्या मागणीनुसार आणखीन 3 इमारतींच्या व्यवस्थेसाठी विचार करू अशी ग्वाही गडकरी यांनी दिली. यावेळी अभिनेता नाना पाटेकर, भाजपा मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार, आमदार अजय चौधरी, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया, उपाध्यक्ष यशोधर वणगे, टाटा कर्करोग रुग्णालयाचे संचालक डॉ. राजन बडवे आदी मान्यवर उपस्थित होते.

कॉटन ग्रीन पूर्व येथील राजस नगर बीपीटी वसाहतीतील सुस्थितीत असलेल्या 3 इमरातींची जागा 1 रुपया भाडे तत्वावर बीपीटी प्रशासनाने टाटा रुग्णालयाला दिली आहे. तसेच सेंट ज्यूड संस्थेतर्फे व्यवस्था करण्यात आली आहे. या 3 इमारतींमध्ये 165 बाल रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक राहू शकतील अशी निवासी व्यवस्था करण्यात आली आहे. तर 70 केमोथेरपीचे बालरुग्ण येथे रहात आहेत. 

टाटा रुग्णालयात कोल्हापूर, कोकण, दिल्ली, मद्रास आदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी साधारण अडीच हजार बालरुग्ण उपचारासाठी येतात. मात्र निवासाच्या गैरसोयींमुळे टाटा कर्करोग रुग्णालयात येणारे बालरुग्ण उपचार न घेता परत जातात. तर अनेक रुग्ण रुग्णालयाच्या जवळपासच्या परिसरातील पदपथावर राहून उपचार घेत असतात. त्यांच्या सोयीसाठी तसेच या बालरुग्णांना वेळेत उपचार मिळावेत या उद्देशाने सदर ठिकाणी रुग्णांसाठी निवासी व्यवस्था करण्यात आली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा