Advertisement

धारावीतील १८ वर्षांवरील तरुण वर्गाला लस द्यावी, राहुल शेवाळे यांची मागणी

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी आता पुन्हा एकदा संकटाच्या उंबरठ्यावर आहे.

धारावीतील १८ वर्षांवरील तरुण वर्गाला लस द्यावी, राहुल शेवाळे यांची मागणी
SHARES

कोविडच्या पहिल्या लाटेत संपूर्ण देशात कोरोनाला रोखण्यासाठी रोल मॉडेल ठरलेली आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी आता पुन्हा एकदा संकटाच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या १५ दिवसांत धारावीत नव्या ८६० रुग्णांची भर पडली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी धारावीत मिशन वॅक्सिनेशन सुरू करण्यात आलं आहे. १८ वर्षांच्या वरील सर्वांचे लसीकरण करण्याबाबत तयार केलेला अॅक्शन प्लान केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसमोर सादर करण्यात आला आहे. खासदार राहुल शेवळेंकडून धारावीतील १८ वर्षांच्या वरील सर्वांचे लसीकरण सुरू करण्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्यात आलं आहे.

धारावीत ८० टक्के लोकसंख्या ही १८ वर्षांच्या वरील वयोगटातली आहे. त्यामुळे सरसकट सर्वांचेच लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यामुळे धारावीतील दाटीवाटीची वस्ती आणि इतर अडचणी पाहता स्पेशल केस म्हणून सरसकट लसीकरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी खासदर राहुल शेवाळे यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत पहिल्या लाटेत मोठ्या संख्येनं रुग्ण सापडले होते. दुसऱ्या लाटेत त्याहीपेक्षा अधिक रुग्ण सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणून वेगवान लसीकरण होणं गरजेचं आहे.

सध्या धारावीत दररोज १००० लोकांचं लसीकरण केलं जातंय. ती क्षमता ५००० लोकांपर्यंत वाढवली जाईल आणि धारावीत लवकरात लवकर १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. कोरोनाची साथ सुरु झाल्यापासून आतापर्यंत धारावीत ५ हजार ७७४ जणांना कोरोनाची लागण झाली. यांपैकी १ हजार ६८९ रुग्ण केवळ गेल्या दीड महिन्यातले आहेत.



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा