Advertisement

सुट्टीसाठी डॉक्टर 'असा' करणार निषेध


सुट्टीसाठी डॉक्टर 'असा' करणार निषेध
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे डॉक्टर रुग्णांना योग्य सेवा मिळावी यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. अशात डॉक्टरांची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळं डॉक्टरांना स्वतःच्या सुरक्षेसाठी सुट्टीची गरज आहे. परंतु, या डॉक्टरांना केवळ एक दिवस सुट्टी देण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. मात्र, महापालिकेच्या या निर्णयाला सायन रुग्णालयाच्या मार्ड संघटनेनं विरोध केला आहे.

महापालिकेच्या सुट्टीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीला गुरुवारपासून सुरुवात करण्यात आली. परंतु, सायन रुग्णालयाच्या मार्ड संघटनेनं शुक्रवारपासून पालिकेच्या या निर्णयाविरोधात ७ दिवस निषेध आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. एक दिवसाचा विश्रांतीनंतर डॉक्टरांना लगेच नॉन कोविड रुग्णांच्या सेवेत हजर व्हायचं आहे. मात्र कोव्हीड ड्युटीवर असताना डॉक्टरांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळं डॉक्टरांचा विश्रांतीचा कालावधी कमी करू नये अशी मागणी हॉस्पिटलमधील मार्डनं केली.

आंदोलनाच्या पहिल्या दिवशी हॉस्पिटलमधील ओपीडी, वार्ड आणि शस्त्रक्रिया विभागातील डॉक्टर आंदोलनाच्या पहिल्या दिवशी डाव्या हातावर काळी फित लावून काम करत आहेत. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांना आलेले नैराश्य दर्शवण्यासाठी निळी फित, चिंतेसाठी हिरवी फित, रागासाठी लाल फित, सचोटीसाठी गडद निळा, आशावाद यासाठी पिवळी आणि शेवटच्या दिवशी सफेद रंगाची फित लावून काम करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा