Advertisement

जे. जे. रुग्णालयात हेमॅटोलॉजी केंद्र सुरू

जे. जे. रुग्णालयामध्ये नुकतंच हेमॅटोलॉजी केंद्र सुरू करण्यात आलं आहे. मुंबईसह पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेज आणि नागपूरच्या सरकारी मेडिकल कॉलेजसह रुग्णालयामध्येही अशा प्रकारचं केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

जे. जे. रुग्णालयात हेमॅटोलॉजी केंद्र सुरू
SHARES

हेमोफिलिया, थ्रोम्बोसिस यांसारख्या रक्ताच्या आजारांसंदर्भात निदान करण्यासाठी जे. जे. रुग्णालयामध्ये नुकतंच हेमॅटोलॉजी केंद्र सुरू करण्यात आलं आहे. मुंबईसह पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेज आणि नागपूरच्या सरकारी मेडिकल कॉलेजसह रुग्णालयामध्येही अशा प्रकारचं केंद्र सुरू करण्यात येणार आहे.


दुर्मिळ आजारांवर संशोधन शक्य

हेमॅटोलॉजी केंद्रामुळे रक्ताच्या संदर्भातील विकारांचं निदान लवकर होण्यास मदत होणार आहे. सध्या भारतात रक्ताच्या संदर्भातील विकारात वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना यासंदर्भात फार माहिती असते. या आजाराच्या उपचारासाठी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची माहितीही या केंद्रामध्ये संकलित करण्यात येणार आहे. त्यामुळे भारतामध्ये कोणकोणत्या प्रकारचे रक्ताचे दुर्मिळ आजार आहेत, यावरही अभ्यास आणि संशोधन करणं शक्य होणार आहे.

हेमॅटोलॉजी केंद्रामुळे रक्ताचे दुर्मिळ आजारावर अभ्यास आणि संशोधन करणे शक्य होणार आहे. दरम्यान पाश्चिमात्य देशांप्रमाणे भारतातही या आजारांचा अभ्यास आणि उपचार यासाठी प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे.
- डॉ. प्रिया पाटील, डॉक्टर, जेजे रुग्णालय व मेडिकल कॉलेज औषधविभाग

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा