Advertisement

मुंबईतल्या 'या' वॉर्डांमध्ये सर्वाधिक कोविडचे रुग्ण

धारावीसारख्या ठिकाणांसह मुंबई आणि त्याच्या उपनगरांमध्येही प्रकरणे वाढली आहेत.

मुंबईतल्या 'या' वॉर्डांमध्ये सर्वाधिक कोविडचे रुग्ण
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) उघड केलेल्या ताज्या अहवालानुसार, बहुतेक उच्च वस्ती असलेल्या काही वॉर्डांमध्ये विशेषतः दक्षिण मुंबई, वांद्रे आणि अंधेरीमध्ये कोरोनाव्हायरस रुग्णांमध्ये ३ ते ५ पट वाढ झाली आहे.

धारावीसारख्या ठिकाणांसह मुंबई आणि त्याच्या उपनगरांमध्येही प्रकरणे वाढली आहेत, ज्यात काहीदिवसांपर्यंत शून्य प्रकरणं नोंदवली गेली होती.

याशिवाय, गेल्या आठवड्यात मुंबईतील ८८ टक्क्यांहून अधिक कोविड-१९ प्रकरणे उच्चभ्रू वस्तीतून आली आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये फारशी प्रकरणे आढळत नाहीत, असं अहवालात म्हटलं आहे. प्रकरणांमध्ये वाढ होत असताना, पालिकेनं मागील आठवड्यात नोंदवलेल्या सुमारे ३,३०० पॉझिटिव्ह प्रकरणांचा अभ्यास केला.

आकडेवारीनुसार कुलाबा, मलबार हिल, वरळी, वांद्रे पश्चिम आणि अंधेरी पश्चिम यासह सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या वॉर्डांमध्ये प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

कुलाबा, नरिमन पॉइंट, चर्चगेट, फोर्ट परिसराचा समावेश असलेल्या वॉर्डमध्ये एका महिन्यात प्रकरणांमध्ये ४ पट वाढ झाली आहे. १८ ते २४ डिसेंबर या कालावधीत कोविड-19 ची संख्या केवळ ३५ वरून १४१ वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे, महालक्ष्मी आणि वरळीचा समावेश असलेल्या ड प्रभागात ८५ वरून २३७ प्रकरणे वाढली आहेत.

दरम्यान, पश्चिम उपनगरांमध्ये, अंधेरी आणि विलेपार्लेसह के पश्चिम भागात दुसऱ्या लाटेपासून सर्वाधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत.

कोविड-19 प्रकरणांमध्ये मुख्यतः आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि जास्त वाढ असलेल्या भागात नोंदवली जात आहे.हेही वाचा

दक्षिण मुंबईतील मलबार हिल टेकडीजवळ निसर्ग उन्नत मार्ग

मुंबईत ११ जणांना ऑमिक्रॉनची लागण

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा