Advertisement

खळबळजनक, मुंबईतील हाऊसिंग सोसायटीतील नागरिकांना दिली बोगस लस

लस घेतल्यानंतर कुणालाही मेसेज आला नाही. तसंच लस घेतल्यानंतर कोणतीही लक्षणं दिसली नाही किंवा दुष्परिणामही दिसून आले नाहीत, असं नागरिकांनी सांगितलं.

SHARES

मुंबईतील एका हाऊसिंग सोसायटीतील नागरिकांनी आपल्याला कोरोनाची (coronavirus) बोगस लस (fake COVID 19 shots) दिल्याचा आरोप केला आहे. सोसायटीतील नागरिकांनी लसीकरण घोटाळा होत असल्याचा दावा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.या सोसायटीत लसीकरण शिबीर आयोजित करून ३९० जणांना लस देण्यात आल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे

कांदिवली (kandiwali) तील हिरानंदानी इस्टेट सोसायटीत ३० मे रोजी लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी ३९० नागरिकांना कोविशिल्ड लस देण्यात आली. या शिबिराची सुविधा राजेश पांडे या व्यक्तीने उपलब्ध केली होती. आपण कोकीलाबेन अंबानी हॉस्पिटलचा प्रतिनिधी असल्याचं त्याने सोसायटीतील नागरिकांनी सांगितलं होते. राजेश पांडे याने सोसायटी समितीच्या सदस्यांशी संपर्क केला होता. तर संजय गुप्ता याने शिबीर घेतलं आणि महेंद्र सिंग यांने सोसायटीतील सोसायटी सदस्यांकडून रोख पैसे घेतले, अशी माहिती नागरिकांनी दिली आहे.

मात्र, लस घेतल्यानंतर कुणालाही मेसेज आला नाही. तसंच लस घेतल्यानंतर कोणतीही लक्षणं दिसली नाही किंवा दुष्परिणामही दिसून आले नाहीत, असं नागरिकांनी सांगितलं. ज्या रुग्णालयांच्या नावाने प्रमाणपत्र दिले गेले, त्या रुग्णालयांनी आपण लसीकरण शिबीर घेतलं नसल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे आपल्याला बोगस लस दिली गेल्याचं या नागरिकांनी समजलं. सोसायटीतील नागरिकांनी प्रति डोस १२६० रुपये दिले आहेत. 

लसीकरण शिबीर कोकीलाबेन अंबानी हॉस्पिटलचं नाव सांगून घेण्यात आलं होतं. मात्र, सोसायटीतील लसीकरण झालेल्या रहिवाशांना देण्यात आलेली प्रमाणपत्र वेगवेगळ्या रुग्णालयांची होती. यामुळे सोसायटीतील लसीकरण झालेल्या नागरिकांची शंका आणखी बळावली. त्यांनी प्रमाणपत्र मिळालेल्या रुग्णालयांशी संपर्क केला. त्यावेळी सोसायटीमध्ये लस पुरवत नसल्याचं रुग्णालयांनी सांगितलं. लसीकरण शिबीर घेतलं नसल्याचं रुग्णालयांनी स्पष्ट केल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. 

 


हेही वाचा -

शाब्बास धारावीकर! सलग दुसऱ्या दिवशी शून्य रुग्णसंख्या

पेट्रोल पुन्हा महागलं; मुंबई-पुण्यात प्रति लिटर १०२ पार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा