Advertisement

शाब्बास धारावीकर! सलग दुसऱ्या दिवशी शून्य रुग्णसंख्या

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गजबजलेला परिसर असलेल्या धारावीत रुग्णसंख्या वाढत असल्याचं समजल्यानंतर आता धारावीनं पुन्हा एकदा आपलं मॉडेल सिद्ध केलं आहे.

शाब्बास धारावीकर! सलग दुसऱ्या दिवशी शून्य रुग्णसंख्या
SHARES

कोरोनाच्या (coronavirus) दुसऱ्या लाटेत गजबजलेला परिसर असलेल्या धारावीत रुग्णसंख्या वाढत असल्याचं समजल्यानंतर आता धारावीनं (dharavi) पुन्हा एकदा आपलं मॉडेल सिद्ध केलं आहे. गेल्या २ दिवसांत धारावीमध्ये कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही.

या वर्षी देखील दुसऱ्या लाटेमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली होती. मात्र, धारावीकरांनी आणि मुंबई महानगर पालिकेनं (bmc) पुन्हा एकदा धारावीमध्ये शून्य रुग्णसंख्या करून दाखवली आहे. मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार सोमवारप्रमाणेच मंगळवारी देखील धारावीत एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. मात्र, त्याचवेळी धारावीत (dharavi) फक्त ११ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे धारावीकरांसाठी आणि मुंबई पालिका प्रशासनासाठी देखील ही दिलासादायक बाब ठरली आहे.

धारावीमध्ये या वर्षी फेब्रुवारी महिन्यात शून्य रुग्ण दिवस पाहायला मिळाला होता. मात्र, त्यानंतर पुढच्या तीन ते चार महिन्यांमध्ये धारावीत मोठ्या संख्येनं रुग्ण वाढले. त्यामुळे दुसऱ्या लाटेचा फटका बसल्यानंतर शून्य रुग्णसंख्येचे सलग दोन दिवस पालिकेसाठी महत्त्वाचे ठरले आहेत.हेही वाचा -

कोकणात अतिवृष्टी तर मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत १७ जूनपर्यंत पावसाचा Yellow Alert


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा