Advertisement

कोकणात अतिवृष्टी तर मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा

मंगळवारपासून पुढील पाच दिवस राज्यात विविध ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Heavy rain) इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

कोकणात अतिवृष्टी तर मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा
SHARES

मागील आठवड्यात मान्सूनचं आगमन होऊन संपूर्ण महाराष्ट्रात (maharashtra) चांगला पाऊस झाला. यानंतर राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला. पण मंगळवारपासून पुढील पाच दिवस राज्यात विविध ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Heavy rain) इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मंगळवारी उत्तर कोकण, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

मागील दोन दिवसांपासून मुंबईत (mumbai) पावसानं विश्रांती घेतली आहे. पण आज पुन्हा मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रायगडमध्ये अतिवृष्टीचा (Very Heavy rainfall) इशारा देण्यात आला आहे.

पुणे, मुंबई, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर रायगड, रत्नागिरी या सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसंच मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. 

बुधवारी १६ जून रोजी सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर बुधवारी मुंबई आणि पुण्यात सामान्य हवामान असेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.हेही वाचा -

मुंबईतील झोपडपट्ट्या कोरोनामुक्तीच्या मार्गावर

राजकीय जाहिरातींना लसीकरण केंद्रांवर मनाई

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा