बेघर मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी समाजसेवी संघटनांचा पुढाकार

Mumbai
बेघर मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी समाजसेवी संघटनांचा पुढाकार
बेघर मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी समाजसेवी संघटनांचा पुढाकार
See all
मुंबई  -  

मनोरुग्णांची समस्या हा राज्याला आणि विशेषत्वाने मुंबईला भेेडसावणारा प्रश्न आहे. मात्र या समस्येवर गांभीर्याने चर्चा झाल्याचे क्वचितच पहायला मिळते. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने गठीत केलेल्या समितीला भारतातील विविध रुग्णालयांकडून देण्यात आलेली मनोरुग्णांची संख्या दहा हजार एवढी आहे. पण, त्याहून ती कित्येक पटीने जास्त असून त्यांच्यावर उपचार आणि पुनर्वसनाकडे नेहमीच दुर्लक्ष होत असल्याची माहिती टाटा इन्स्टिट्युट ऑफ सायन्सच्या (टीस) अभ्यासकांकडून देण्यात आली आहे. मुंबई आणि तामिळनाडूतल्या एका शहरातील मनोरुग्णांच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी टाटा आणि बनयान या संस्था पुढे सरसावल्या आहेत.


बेघर मनोरुग्णांना आधार देण्याचा प्रयत्न

बेघर मनोरुग्णांना आधार मिळावा यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. मुंबई आणि तामिळनाडूमधील नागपाडा शहरांमध्ये मनोरुग्णालयातील बेघर रुग्णांना मदतीचा हात म्हणून टीस या संस्थेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

अनेकदा मनोरुग्ण असल्याकारणाने कुटुंबिय रुग्णाला मनोरुग्णालयात ठेवून देतात. नातेवाईकांचा आधार नसल्यामुळे मनोरुग्ण वर्षानुवर्षे रुग्णालयातच राहतात. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रुग्णांची प्रकृती स्थिरावली की त्याचे पुनर्वसन होणे गरजेचे असते. पण, राज्य सरकारकडून अशा मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी काहीच प्रयत्न केले जात नसल्याचे समोर आले आहे.


'टाटा'च्या माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार

'टीस' या संस्थेत काही माजी विद्यार्थी काम करत आहेत. मुंबईतील तारीक आणि तामिळनाडूतील लक्ष्मी रमाकांत यांनी या संस्थेतर्फे मनोरुग्णांच्या पुनर्वसनाचे काम हाती घेतले आहे. तारीक हा 'कोशिश' या प्रकल्पांंतर्गत गेली 10 वर्ष काम करत आहे. मुंबईतील भिक्षेकरी गृहांमधील रुग्णांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी हा मदत करत आहे.

तर, बनियनच्या उपक्रमाअंतर्गत तामिळनाडूत काम करणाऱ्या लक्ष्मी रमाकांतने याच संस्थेतून पदवी घेतली आहे. मनोरुग्णांवर उपचार करता करता त्यांना चांगली वागणूक देणे ही महत्त्वाचे असते असं लक्ष्मीचे म्हणणे आहे.“या कायद्यात मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना अटक करण्याचीही तरतूद आहे. मनोरुग्ण हा विषय आपल्याकडे तेवढासा गंभीरतेने घेतला जात नाही. मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारने पावले उचलण्याची गरज आहे.  हा विषय आपण सगळ्यांनीच गंभीरतेने घेतला पाहिजे.”

एस. परशुरामन, संचालक, टाटा सामाजिक विज्ञान संस्था


संस्थेच्या विद्यार्थ्यांनी बेगर्स कायद्यातील काही त्रुटी समोर आणल्या. रस्त्यावर भीक मागणाऱ्या मनोरुग्णांना शिक्षा म्हणून भिक्षेकरी  गृहात टाकले जाते. त्यात बहुतांश मनोरुग्ण असतात. या रुग्णांवर वर्षानुवर्षे उपचार होत नाहीत आणि ते तिथेच खितपत पडतात.


“ बनियनच्या उपक्रमांंतर्गत मनोरुग्णांचे विविध गट तयार केले जातात. त्यांच्या कौशल्य विकासाच्या वाढीसाठी काम केले जाते. मनोरुग्णांशी शांतचित्ताने,  संयम राखून बोलावं लागतं. त्यांचा तुमच्यावर विश्वास बसण्यासाठीच जवळपास 6 महिने लागतात. ”

लक्ष्मी रमाकांत, विद्यार्थी, टाटा

टाटा संस्थेकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, ठाणे जिल्ह्यातील मनोरुग्णालयात 8 हजार मनोरुग्ण आहेत. तसंच आतापर्यंत टाटा संस्था 30 ते 40 हजार लोकांपर्यंत पोहोचले आहेत. तसंच आपला लवकरच अधिकाअधिक मनोरुग्णांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचं तारीक या विद्यार्थ्याने सांगितले.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.