Advertisement

लस ओमिक्रॉन व्हेरिएंटवर किती प्रभावी?, आरोग्य मंत्रालयाची माहिती

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी ओमिक्रॉन व्हेरिएंट आणि लसीच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देत मोठा दिलासा दिला आहे.

लस ओमिक्रॉन व्हेरिएंटवर किती प्रभावी?, आरोग्य मंत्रालयाची माहिती
SHARES

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी ओमिक्रॉन व्हेरिएंट आणि लसीच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देत मोठा दिलासा दिला आहे. कोरोनावरील लस ओमिक्रॉन व्हेरिएंटवर प्रभावी ठरत नाही, असा कुठलाही पुरावा नसल्याचं लव अग्रवाल म्हणाले.

ओमिक्रॉनवर लस काम करत नाही, अशी चर्चा आणि शंका व्यक्त करण्यात येत आहे. पण केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं यावर स्पष्टीकरण देत मोठी माहिती दिली. ओमिक्रॉन व्हेरिएंटवर लस प्रभावी नाही, असे कुठलेही पुरावे सध्यातरी समोर आले नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.

संपूर्ण लसीकरण करा, मास्क घाला, गर्दीची ठिकाणं कटाक्षानं टाळा, असं आवाहन नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी नागरिकांना केलं आहे. भारतात वापरता येत असलेल्या सर्व लसी या प्रभावी आहेत. शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानंतर आणि अभ्यासानंतर बूस्टर डोस द्यायचा की नाही? यावरही निर्णय घेतला जाईल, असं व्ही. के. पॉल यांनी सांगितलं.

Gennova mRNA ही लस दुसऱ्या आणि ३ टप्प्याच्या चाचण्यांमधून खूप चांगल्या प्रकारे पुढे जात आहे. ती सामान्य तापमानात स्थिर असते. ही लसीसाठी उत्तम तंत्रज्ञानाचा उपयोग केला गेला, असं पॉल म्हणाले.हेही वाचा

जानेवारीत ओमिक्रॉन रुग्णांमध्ये होणार वाढ - आरोग्य विभाग

मुंबईत मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ, मेट्रोचं काम कारणीभूत

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा