Advertisement

युवापिढीत वाढलं तंबाखू व्यसनाचं प्रमाण


युवापिढीत वाढलं तंबाखू व्यसनाचं प्रमाण
SHARES

युवापिढीत तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करण्याचं प्रमाण वाढत असल्याचं जागतिक प्रौढ तंबाखू सर्वेक्षणाच्या अहवालात उघड झालं आहे.

जागतिक प्रौढ तंबाखू सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, महाराष्ट्रात गेल्या ७ वर्षांमध्ये युवकांमधील तंबाखू व्यसानाचं प्रमाण कमालीचं वाढलं आहे. १५ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या वापराचं प्रमाण २०१० मध्ये २.९ टक्के एवढं होतं. हे प्रमाण २०१८ मध्ये वाढून ५.५ टक्क्यांवर गेलं. ही वाढ तब्बल ९० टक्के इतकी आहे. हे चिंतेचं मोठं कारण असून त्याचा परिणाम राज्यातील सार्वजनिक आरोग्यावर होत आहे.


तंबाखू वापराचं वय घटलं

मागील ७ वर्षांमध्ये राष्ट्रीय स्तरावर १५ ते १७ वयोगटातील युवकांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाच्या प्रमाणात ५४ टक्के इतकी वाढ झाली. तंबाखू वापराच्या सुरुवातीच्या वयोगटाचं सरासरी वय १८ ते १५ वर्षे होतं. हे प्रमाण घटून १७. ४ वर्षे इतकं झालं आहे. यातुलनेत राष्ट्रीय स्तरावरील सरासरी वय १७.९ ते १८.९ वर्षांपर्यंत वाढलं आहे.



५२९ मुलं पहिल्यांदा तंबाखूचा वापर

तर भारतात दररोज ५५ हजार तंबाखू सेवन करणारी मुले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात दररोज ५२९ मुले पहिल्यांदा तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करतात.


जी मुले लहान वयात तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन सुरू करतात. त्यापैकी केवळ ५ टक्के जणांनाच या व्यसनातून मुक्ती मिळते. मात्र, १८ वर्षापर्यंत जर आपण कुठल्याही तंबाखूचा वापर केला नाही, तर ९० टक्के लोक तंबाखूच्या व्यसनाला बळी पडणार नाहीत. तंबाखू हे मृत्यूचं निरुपयोगी कारण आहे. भारतात, दरवर्षी तोंडाचा कर्करोग होताना जवळपास १ लाख नवीन प्रकरणे आमच्या समोर येत असतात. ज्यापैकी ५० टक्के मृत्यू १२ महिन्यांत होतात.

- डॉ. पंकज चतुर्वेदी, प्रोफेसर आणि कॅन्सर सर्जन, टाटा मेमोरियल हॉस्पिटल




आम्ही शैक्षणिक संस्थांना व्यसनमुक्त बनवण्यासाठी कार्यरत आहोत. केवळ इतकंच नव्हे आम्ही 'कोटपा' कायद्याचं अनुपालन करणाऱ्या शाळांच्या संख्येत लक्षणीय वाढ करणार आहोत. तसंच आम्ही शाळांमध्ये मुलांना सुरक्षित वातावरणात पुरवण्यास आणि तंबाखू विरोधीकार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध आहोत.

- विनोद तावडे, शिक्षण मंत्री

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा