Advertisement

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप मिटेना, पाचव्या दिवशीही सुरू


प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप मिटेना, पाचव्या दिवशीही सुरू
SHARES

मागण्या पूर्ण होईपर्यंत आपण संप मागे नाही घेणार यावर प्रशिक्षणार्थी डॉक्टर ठाम राहिले अाहेत. त्यामुळं रविवारी पाचव्या दिवशीही संप सुरूच अाहे. अद्यापही मागण्या मान्य होत नसल्याने प्रशिक्षणार्थी डॉक्टर अाक्रमक झाले अाहेत.


विद्यावेतन कमी 

वैद्यकीय शिक्षणात विद्यार्थ्यांना किमान एक सेमिस्टर इंटर्नशीप करावी लागते. यासाठी त्यांना विद्यावेतन दिलं जातं. सध्या महाराष्ट्रात ६  हजार रुपये विद्यावेतन दिलं जातं. मात्र, इतर राज्यांमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना १५ हजार रुपयांपेक्षा अधिक विद्यावेतन मिळतं. हे वेतन वाढवावं यासाठी हे डाॅक्टर १३ जूनपासून संपावर गेले अाहेत. १२ जून रोजी  प्रशिक्षणार्थी डॉक्टर संघटना आणि प्रशासनाची बैठक झाली. मात्र, यावेळी चर्चा यशस्वी झाली नव्हती.  

महाराष्ट्रभरात स्वच्छ्ता मोहीम

मुंबई , पुणे , नागपूरसह संपूर्ण राज्यात हा संप सुरु अाहे.  आता डाॅक्टरांनी निषेधार्थ रुग्णालयाचा परिसर स्वच्छ करण्यास सुरूवात केली आहे.


सेवाधर्म विसरणार नाही

अामच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवणार आहोत.  पण जर कधी इमर्जन्सी केस आली तर आम्ही आमचा सेवाधर्म विसरत नाही, असं प्रशिक्षणार्थी डॉ. अनिकेत माने यांनी सांगितलं.



हेही वाचा -  

तेल, मीठ अाणि साखर वापरा 'एक चम्मच कम' !

३० मिनिटात काढली चिमुकलीच्या श्वसननलिकेतून इअररिंग



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा