Advertisement

ठाण्यात रिक्षावर कोसळलं झाड, २ जणांचा मृत्यू

रात्रीच्या सुमारास गडकरी रंगायतनसमोर पाली तलावाजवळ ही दुर्घटना घडली.

ठाण्यात रिक्षावर कोसळलं झाड, २ जणांचा मृत्यू
SHARES

ठाण्यातील (Thane) गडकरी रंगयातन परिसरात रिक्षावर ( Auto riksha ) झाड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत रिक्षाचालक आणि एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास गडकरी रंगायतनसमोर पाली तलावाजवळ ही दुर्घटना घडली. रिक्षाचालक एका प्रवाशाला घेऊन जात असताना अचानक एक झाड रिक्षावरच कोसळले. झाड रिक्षावर कोसळल्यामुळे रिक्षातील चालकाचा आणि प्रवाशाचा जागेवरच मृत्यू झाला. या दुर्घटनेत रिक्षा चक्काचूर झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. उन्मळून कोसळलेले झाड बाजूला करण्यात आले आहे. मृत व्यक्तींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.



हेही वाचा

मुंबईतील 'या' रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास

तब्बल 'इतके' रुग्ण गृहविलगीकरणात

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा