Advertisement

मासिक पाळी दरम्यान लस घ्यावी का? लसीबद्दलचे 'हे' गैरसमज दूर करा

केंद्रानं १ मे पासून १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस घेण्याची परवानगी दिली आहे. पण मासिक पाळी दरम्यान लस घेऊ नका असा मेसेज व्हायरल होत आहे. जाणून घ्या यामागील सत्य.

SHARES

सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना आणि लसीविषयी सर्व प्रकारच्या अफवा पसरतच आहेत. यामुळे लोकांमध्ये अविश्वासाची भावनाच वाढत नाही तर ती अफवा पुढे पसरवण्यातही मदत होत आहे.

केंद्रानं १ मे पासून १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस घेण्याची परवानगी दिली आहे. पण दरम्यान, सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली असून, असा दावा केला आहे की महिलांनी मासिक पाळीच्या आधी किंवा नंतर लसीकरण करू नये.

याव्यतिरिक्त, बरेच लोक अद्याप लसीकरणाच्या तथ्यांविषयी अज्ञान आहेत. याबद्दल काही खबरदारीच्या उपाययोजना आहेत, ज्या सामान्य लोकांना माहित असल्या पाहिजेत, जेणेकरुन लोक जागरूक होऊ शकतील.

१) सर्दी किंवा ताप असल्यास लस घेऊ शकता का?

आजारी असाल तरी ही लस दिली जाऊ शकते. लस तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते. याचा कोणत्याही रोगाशी काही संबंध नाही. होय, काही विशिष्ट प्रकरणांमध्ये लसी देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. जर एखाद्याला गंभीर आजारानं ग्रासलं आहे. तर तो बराच काळ आजारी आहे, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं लस घेणं योग्य ठरेल.

२) गर्भधारणेदरम्यान लसीकरण सुरक्षित आहे का?

अगदी! गर्भवती महिलांचे लसीकरण आईस संसर्गापासून रोखू शकते आणि असं केल्यानं गर्भाचे संरक्षण देखील शक्य आहे. गर्भधारणे दरम्यान लसीकरण गर्भ आणि बाळाचे थेट संरक्षण करते. कारण आईच्या लसीकरणातून गर्भ प्रतिपिंडे मिळतात. म्हणूनच गर्भधारणेदरम्यान लसीकरण करणे इतके महत्वाचे आहे. गर्भधारणेदरम्यान लसीकरण ही भारतातील गर्भधारणेच्या परिणामास सुधारित करण्यासाठी एक प्रभावी योजना आहे.

३) महिला मासिक पाळीच्या दरम्यान लस घेऊ शकतात?

PIBनं एका ट्विटमध्ये म्हटलं आहे की, बनावट पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहे. व्हायरल पोस्टमध्ये असा दावा केला आहे की, महिलांनी मासिक पाळीच्या ५ दिवस आधी आणि नंतर १९ व्हॅक्सीन घेऊ नये. पण यावर पीआयबीनं म्हणालं आहे की, अफवांवर विश्वास ठेऊ नका! लसीचा मासिक पाळीशी काही संबंध नाही.



हेही वाचा

लक्षणांवरून COVID झालाय की SARI हे कसं ओळखाल?

रेमडेसिवीर हवंय? 'या' क्रमांकावर करा काॅल

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा