Advertisement

रेमडेसिवीर हवंय? 'या' क्रमांकावर करा काॅल

रेमडेसिवीर इंजेक्शनला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. रुग्णांचे हाल होऊ नये आणि त्यांना इंजेक्शन सहज उपलब्ध व्हावे यासाठी हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.

रेमडेसिवीर हवंय? 'या' क्रमांकावर करा काॅल
SHARES

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने बेड्स, आॅक्सिजन,  रेमडेसिवीर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणावर कमतरता भासत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे  इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. रुग्णांचे हाल होऊ नये आणि त्यांना इंजेक्शन सहज उपलब्ध व्हावे यासाठी हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शनची माहिती एका कॉलवर उपलब्ध होणार आहे.

रेमडेसिवीरच्या विक्रीवर कोणतेही नियंत्रण नसल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू झाला. मोठ्या किमतीत ते विकले जाऊ लागले. त्यामुळे राज्य आरोग्य विभागाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत रेमडेसिवीर देण्याचा निर्णय घेतला आहे. 

यासाठी १८००२२२३६५ हा हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. रेमडेसिवीर आवश्यकता असलेल्या रुग्णांनी या हेल्पलाईनवर काॅल केल्यावर तेथे संपूर्ण माहिती द्यावी लागेल. हेल्पलाईनचे कर्मचारी रुग्णाची माहिती संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाला देतील. माहितीमध्ये काही कमतरता आढळल्यास जिल्हाधिकारी कार्यालय संबंधित व्यक्तीस कॉल करेल.  मात्र, रेमडेसिवीर रुग्ण दाखल असलेल्या रूग्णालयात दिलं जाईल. कोणत्याही व्यक्तीला रेमडेसिवीर दिलं जाणार नाही. 

मुंबईतील रुग्णांसाठी मात्र हा हेल्पलाईन क्रमांक नसणार आहे.  मुंबई महापालिका आणि एफडीएकडे मुंबईकरांना रेमडेसिवीर देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जर कोणी हेल्पलाइन नंबरवर कॉल केला तर हेल्पलाइनवरील कर्मचारी त्यांची माहिती पालिकेला कळवतील. हेही वाचा -

कोरोना रूग्णांना येणाऱ्या अडचणींसाठी BMC च्या 'या' क्रमांकावर संपर्क साधा

बेड्स, रूग्णवाहिका मिळण्यासाठी नवी मुंबईकरांसाठी हेल्पलाईन सुविधा, 'हा' आहे क्रमांक

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा