Advertisement

जागतिक महिला दिनी कोविड योद्धे बनूनी महिला करणार रक्तदान

'सावित्री'च्या लेकींनी अजून एक नवीन पायंडा मागील २०२० वर्षा पासून सुरू केला. जागतिक महिला दिन रक्तदान करून साजरा करायचा.

जागतिक महिला दिनी कोविड योद्धे बनूनी महिला करणार रक्तदान
SHARES

पोलीस दल, वैमानिक, मर्दानी खेळ, इतर अनेक क्षेत्र अश्या पुरुषांची मक्तेदारी असलेल्या विविध क्षेत्रातही स्त्रिया आता मागे राहिलेल्या नाहीत. या 'सावित्री'च्या लेकींनी अजून एक नवीन पायंडा मागील २०२० वर्षा पासून सुरू केला. जागतिक महिला दिन रक्तदान करून साजरा करायचा.

सामान्य,गरजू रुग्णांना अविरत सेवा देणाऱ्या केईएम रुग्णालयात जीवनदाता सामाजिक संस्थेच्या महिला ग्रुपनं जागतिक महिला दिन एका अनोख्या सामाजिक उपक्रमानं साजरा करण्याचं ठरवलं आहे. 

जीवनदाता सामाजिक आणि केईएम रुग्णालय रक्तपेढी, परेल मुंबई संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं घे भरारी रक्तदानासाठी रक्तदान शिबीराचं आयोजन केलेलं आहे.

जागतिक महिला दिनी म्हणजेच ८ मार्च २०२१ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत  केईएम रुग्णालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे.

जागतिक महिला दिनी हळदीकुंकू समारंभ,पिकनिक, गेट टूगेदर आणि इतर अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित होत असतात. पण याला अपवाद हा आगळा वेगळा  अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे. 

२०२१ च्या रक्तदान शिबिरात यात खंड न पडू देता हा सामाजिक उपक्रम अधिक यशस्वीपणे सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करूनच यशस्वी करण्यावर भर असणार आहे.

हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे महिलांचे प्रमाण रक्तदानात कमी आहे हे मान्य पण शुन्य तर मुळीच नाही. फक्त महिलांचे रक्तदान शिबीर सुद्धा असू शकते. यातच महिला रक्तदानात मागे नाहीत याचे उत्तर मिळते.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मनस्वी शिवलवकर, विजया जाधव, अंजली धुमाळ, सुजाता आव्हाड, अश्विनी म्हात्रे, जान्हवी नाईक, शिल्पा सकपाळ, सुवर्णा कुळकर्णी, अश्विनी म्हात्रे, आरोही काळे,सिद्धी दळवी, श्रुती थळे, तृप्ती महाडिक,अपर्णा निमकर, जयश्री हांडे, अपर्णा पवार, मिनल कुडाळकर, आरती म्हात्रे, कविता ससाणे आणि इतर अनेक महिला विशेष मेहनत घेत आहेत.संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा