Advertisement

वर्क फ्रॉम होम करताय? मग, आरोग्याच्या 'या' तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका

पीजीआयच्या नेत्ररोग विभागातील प्रमुख डॉ. कुमुदिनी शर्मा यांनी केलेल्या सर्वेक्षण अहवालात हे उघड झालं आहे.

SHARES

बराच तास मोबाइल आणि संगणकावर राहिल्यानं डोळ्यांना त्रास होतो. याशिवाय दृष्टीवर परिणाम, चिडचिड असे अनेक त्रास होतात. जर कोणाला चष्मा लागला असेल तर चष्माचा नंबर आणखी वाढतो. पीजीआयच्या नेत्ररोग विभागातील प्रमुख डॉ. कुमुदिनी शर्मा यांनी केलेल्या सर्वेक्षण अहवालात हे उघड झालं आहे.

मोबाईलमुळे समस्या वाढल्या

डॉ. कुमुदिनी शर्मा म्हणतात की, यावेळी ओपीडीमध्ये ५० हून अधिक मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यांच्या तपासणीत ६० हून अधिक मुलांचे डोळे वक्र झाले असल्याचे आढळले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. यामध्ये ७ आणि १३ वर्षांच्या दोन मुलांचा समावेश आहे. १३ वर्षांच्या मुलावर ऑपरेशन करावे लागेल. एक वर्षापूर्वी या मुलांच्या डोळ्यांना त्रास झाला होता.

२० मिनिटांची विश्रांती हवी

डॉ कुमुदिनी शर्मा सांगतात की, वाचताना देखील मुलांनी एकटक पाहिले नाही पाहिजे. पापण्या सतत लुकलुकल्या पाहिजेत. शाळेत त्यांना प्रत्येक वर्गानंतर किमान २० मिनिटं विश्रांतीदिली हवी. यावेळेत मुलांनी फेरफटका मारून इकडची तिकडची चित्र पाहिली पाहिजेत. डोळे झोंबत असतील तर पाण्यानं धुवा. आपल्याला अधिक त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

या गोष्टी लक्षात ठेवा

  • मोबाइल आणि संगणक स्क्रीन ३० सेमी अंतरावर असावी
  • हात दूर ठेवा
  • स्क्रीन डोळ्याच्या खाली असावी
  • स्क्रीनचा रंग निळा ठेवा
  • पडद्यावरील लाईट कमी करा
  • ... नाहीतर हा त्रास होईल

डोळ्यांची जळजळ, चिडचिड, कोरडेपणा, अंधुक दृष्टी, कमी प्रकाश, डोकेदुखी, खांदा आणि मान दुखणे या व्यतिरिक्त बर्‍याच लोकांना चष्मा लागला किंवा चष्माचा नंबर वाढला आहे.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा