चेंबूरमध्ये डेंग्यूचा बळी

 Chembur
चेंबूरमध्ये डेंग्यूचा बळी

चेंबूर - डेंग्यूची लागण झाल्याने चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत राहणाऱ्या गीत पवार (३१) या तरुणाचा सोमवारी मृत्यू झाला. या परिसरात गेल्या अनेक जाणांना डेंग्यूची लागण झाली आहे. मात्र पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार इथल्या रहिवाशांनी केली आहे. दहा दिवसांपूर्वी गीत पवार आणि त्याचा लहान भाउ राकेश पवार (२७) या दोघांना डेंग्यूची लागण झाली होती. त्यामुळे दोघांनाही एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरू असताना सोमवारी सायंकाळी गीतचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

Loading Comments