Advertisement

मेट्रो - 4 आणि मेट्रो - 2 ब साठी दहा कंपन्या उत्सुक


मेट्रो - 4 आणि मेट्रो - 2 ब साठी दहा कंपन्या उत्सुक
SHARES

वडाळा - घाटकोपर - ठाणे - कासारवडवली मेट्रो - 4 आणि डी. एन. नगर - मानुखर्द मेट्रो -2 ब च्या बांधकामाच्या निविदांना कंपन्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या दोन्ही मेट्रो मार्गाच्या बांधकामाच्या निविदा नुकत्याच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)कडून उघडण्यात आल्या आहेत. त्यानुसार मेट्रो - 4 च्या पॅकेज आणि मेट्रो - 2 ब च्या चार पॅकेजसाठी दहा कंपन्यांनी निविदा सादर केल्याची माहिती 'एमएमआरडीए'कडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता या कंपन्यांपैकी कोणत्या कंपन्या मेट्रोचे कंत्राट मिळविण्यात यशस्वी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या दोन्ही मेट्रो मार्गाचे काम डिसेंबर 2017 अखेरीस सुरू करण्याचा 'एमएमआरडीए'चा मानस आहे. त्यामुळे लवकरच या निविदांमधून कंत्राटदार कंपनीची निवड करून त्यांना कंत्राट बहाल होण्याची शक्यता आहे. जेणेकरुन सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करत डिसेंबरअखेरीस काम सुरू करता येईल.

या आहेत कंपन्या -
मे. लार्सन अॅण्ड टुर्बो कंपनीने मेट्रो-ब मधील एका पॅकेजसाठी तर मेट्रो - 4 मधील चार पॅकेजसाठी निविदा सादर केली आहे.
मे. अॅफकाॅन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने मेट्रो - 2 ब मधील एका पॅकेजसाठी तर मेट्रो - 4 मधील दोन पॅकेजसाठी उत्सुकता दर्शवली आहे.
मे. जीएचईसी - आरसीसी - जेव्ही - चायना कंपनीने मेट्रो 2 ब च्या दोन आणि मेट्रो - 4 च्या दोन पॅकेजसाठी निविदा भरली आहे.
मे. जे. कुमारने मेट्रो - 2 ब च्या दोन तर मेट्रो - 4 च्या एका पॅकेजसाठी उत्सुकता दाखवली आहे.
मे. सिम्प्लेक्स कंपनीने मेट्रो - 2 ब च्या दोन पॅकेजसाठी निविदा भरली आहे.
मे. रिलायन्स - आरडीई - जेव्हीने मेट्रो - 2 ब च्या तीन तर मेट्रो - 4 च्या तीन पॅकेजसाठी उत्सुकता दर्शवत निविदा सादर केली आहे.
मे. आयडीडी कंपनीने मेट्रो - 2 ब मधील एक तर मेट्रो - 4 मधील एका पॅकेजच्या कामासाठी निविदा सादर केली आहे.
मे. सीएचईसी - टीपीएलने मेट्रो - 2 ब मधील दोन तर मेट्रो - 4 मधील तीन पॅकेजसाठी निविदा सादर केल्या आहेत.
मे. एनसीसीने मेट्रो - 2 च्या दोन तर मेट्रो - 4 च्या दोन पॅकेजसाठी उत्सुकता दर्शवली आहे.
मे. जेएसीने मेट्रो - 3 मधील दोन तर मेट्रो - 4 मधील दोन पॅकेजच्या बांधकामासाठी निविदा सादर केली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा