Advertisement

मेट्रोच्या कामासाठी 159 झाडे तोडणार


मेट्रोच्या कामासाठी 159 झाडे तोडणार
SHARES

मुंबई मेट्रोसाठी आता 159  झाडे तोडली जाणार आहेत. मेट्रो आणि इतर शासकीय कामांच्या आड येणारी 159 झाडे तोडण्यास आणि 107 झाडे पुनर्रोपित करण्यास नुकतीच पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली. 

मेट्रो-३ साठी आरेमध्ये ३३ हेक्टर जागेवर कारशेड उभारले जाणार होते. यासाठी हजारो झाडांचा बळी जाणार होता. त्यामुळ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या कारशेडला विरोध दर्शवला होता. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना आरेमध्ये कारशेडविरोधात आंदोलनही करण्यात आले होते. झाडे तोडण्यासाठी आमचा विरोध आहे, असेच शिवसेनेकडून सांगण्यात आले होते. त्यानंतरही भाजप आणि इतर सदस्यांच्या जोरावर वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये झाडे तोडण्यास मंजुरी देण्यात आली होती.

त्या पार्श्वभूमीवर नुकतंच पुन्हा मेट्रो 2 आणि 7 च्या कामासाठी 159 झाडे तोडण्याची तर 107 झाडे पुनर्रोपित करण्याची मंजुरी वृक्ष प्राधिकरण समितीकडे मागण्यात आली होती. वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये झाडे तोडण्याच्या प्रस्तावाचे भाजपाने स्वागत केले . मुंबईच्या विकासाच्या आड येणारी आणि आवश्यक असलेली झाडे तोडली पाहिजेत. झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने मेट्रोचे काम वेगाने होईल, असे भाजपा नगरसेवक अभिजित सामंत यांनी म्हटले.

झाडे तोडण्यासाठी आलेले प्रस्ताव हे मेट्रो स्टेशनच्या बाजूचे रस्ते आणि नाले आदी कामासाठी होते. त्यामुळे आमचा विरोध मोट्रोच्या कामासाठी नाही. आमचा विरोध झाडे तोडण्याला आहे. आवश्यक असतील तितकी झाडे वाचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. यामुळेच झाडे तोडण्यासाठी आलेल्या प्रस्तावामधील झाडांची संख्या कमी झाल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा