Advertisement

म्हाडा लॉटरीत ५ टक्के घरं दिव्यांगांसाठी राखीव, जितेंद्र आव्हाडांची घोषणा

दिव्यांग व्यक्तींनाही म्हाडाच्या लॉटरीत सहभागी होता यावे म्हणून दिव्यांग प्रवर्गाची घोषणा करण्यात आली आहे.

म्हाडा लॉटरीत ५ टक्के घरं दिव्यांगांसाठी राखीव, जितेंद्र आव्हाडांची घोषणा
SHARES

मुंबईत दिव्यांग व्यक्तींना आता हक्काचं घर मिळणार आहे.  म्हाडाच्या लॉटरीमध्ये (MHADA lottery) ५ टक्के घरं दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.  गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ही महत्त्वाची घोषणा केली आहे.

मुंबईत हक्काचे घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. यासाठी म्हाडाची लॉटरी सर्वांना आशेचा किरण असतो. कारण सर्वात परवडणारी घरं म्हाडा उपलब्ध करून देते. दिव्यांग व्यक्तींनाही म्हाडाच्या लॉटरीत सहभागी होता यावे म्हणून दिव्यांग प्रवर्गाची घोषणा करण्यात आली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. 

म्हाडा लॉटरीमध्ये आता ५ टक्के घरे दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव ठेवली जाणार आहेत. भविष्यात निर्माण होणाऱ्या गृहनिर्माण विभागातील सर्व प्रकल्पांसाठी हा निर्णय लागू असणार आहे, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, दिवाळीत मुंबईतल्या चार हजार घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहेत. यापैकी जवळपास ३४०० घर ही एकट्या गोरेगावमध्ये असतील. 



हेही वाचा - 

मुंबईच्या चौपाट्यांवर पोलिसांची आता ‘एटीव्ही’वरून गस्त

मुंबई उपनगरातील नागरिकांना दिलासा, गोरेगावमध्ये 'इथं' नवं ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र सुरू

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा