Advertisement

कुलाबा संक्रमण शिबिरातील कुटुंबियांना हक्काचं घर मिळणार

कुलाबा संक्रमण शिबिरातील ९१ कुटुंबांना लवकरच हक्काचं घर मिळणार आहे. या पुनर्विकास प्रकल्पाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

कुलाबा संक्रमण शिबिरातील कुटुंबियांना हक्काचं घर मिळणार
SHARES

कुलाबा संक्रमण शिबिरातील ९१ कुटुंबांना लवकरच हक्काचं घर मिळणार आहे. या पुनर्विकास प्रकल्पाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.


इमारती जीर्ण

कुलाब्यात पडलेल्या इमारतीतील कुटुंबियांना ४० वर्षांपूर्वी संक्रमण शिबिरात स्थलांतरीत करण्यात आलं होतं. परंतु कालांतरानं संक्रमण शिबिरातील इमारतीही जीर्ण झाल्याने धोकादायक झाल्या आहेत. त्यामुळं या इमारतींमध्ये राहणाऱ्या कुटुंबियांना जीव धोक्यात घालून याठिकाणी राहावं लागत होतं. आता याच पार्श्वभूमीवर या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच या संक्रमण शिबिरातील जुन्या ११ इमारतींची दुरुस्तीही करण्यात आली असून त्यात पहिल्या टप्प्यातील रहिवाशांना स्थलांतरित करण्याचं कामही पूर्ण करण्यात आलं आहे.


हक्काची घरं

जीर्ण झालेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यातील इमारतींचं बांधकाम वर्षभरात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. यामध्ये ९१ कुटुंबियांना घरे देण्यात येणार आहेत. या पुनर्विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी शिवसेना नेते-उद्योगमंत्री सुभाष देसाई, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, ‘म्हाडा’चे अध्यक्ष उदय सामंत, मुंबई म्हाडाचे सभापती मधू चक्हाण, गृहनिर्माण राज्यमंत्री रकींद्र कायकर, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, खासदार अरविंद साकंत, शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ आदी उपस्थित होते.




हेही वाचा -

तारापूर, भाभा अणुऊर्जा प्रकल्पाचं काम थांबवा, इंजिनिअरिंगचा विद्यार्थी कोर्टात

मुंबई जगातलं १६ वं सर्वांत महागडं शहर




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा