तारापूर, भाभा अणुऊर्जा प्रकल्पाचं काम थांबवा, इंजिनिअरिंगचा विद्यार्थी कोर्टात

तारापूर आणि भाभा अणुऊर्जा प्रकल्प तातडीने बंद करण्याची मागणी २१ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. तहा निजाम असं या विद्यार्थ्याचं नाव आहे.

SHARE

पालघर जिल्ह्यात वारंवार येणाऱ्या भूकंपाचा धोका लक्षात घेऊन सुरक्षेच्या कारणास्तव तारापूर आणि भाभा अणुऊर्जा प्रकल्प तातडीने बंद करण्याची मागणी २१ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. तहा निजाम असं या विद्यार्थ्याचं नाव असून त्याने न्यायालयात यासंदर्भात एक जनहित याचिका (PIL) दाखल केली आहे.


भूकंपाचे ४२ धक्के

नोव्हेंबर २०१८ पासून आतापर्यंत पालघर जिल्ह्यात भूकंपाचे ४२ लहान-मोठे धक्के बसले आहेत. यामुळे जिल्ह्यातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यातच तारापूर अणुऊर्जा विदयुत प्रकल्प (TAPS) पालघरमध्येच येत असून भाभा अणुऊर्जा प्रकल्प (BARC) पालघरपासून केवळ ७० किमीच्या अंतरावर आहे.

हे दोन्हीही प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. अशा स्थितीत भूकंपाच्या एखाद्या मोठ्या धक्क्यामुळे अणुऊर्जा प्रकल्पाचं नुकसान झालं, तर मोठी जिवीतहानी होऊ शकते, अशी भीती या याचिकेतून व्यक्त करण्यात आली आहे.


यंत्रणा कितीपत सज्ज?

पालघर जिल्ह्यात समजा अशी नैसर्गिक आपत्ती आली, तर अशा आपत्तीचा सामना करण्यासाठी राज्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज आहे का? अशी राज्य सरकारला विचारणा करण्याची मागणी देखील या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

डहाणू तालुक्यातील धुंदलवाडीजवळ भूकंपाचं केंद्र असून भूकंपामुळे जवळपासची १७ गावे प्रभावित झाल्याची माहिती पालघरचे जिल्हाधिकारी डाॅ. प्रशांत नारनवरे यांनी दिली. भूकंपग्रस्त भागातील रहिवाशांना तंबूचे वाटप करण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत.हेही वाचा-

मुंबई राज्यातील सर्वात प्रदूषित शहर

नीरव मोदीचा आलिशान बंगला डायनामाईटने उडवणार!संबंधित विषय
ताज्या बातम्या