Advertisement

बेस्टची तिजोरी फुगली


बेस्टची तिजोरी फुगली
SHARES

मुंबई - बेस्टकडून बसपास आणि पास नुतनीकरणासाठी 500,1000 च्या नोटा स्वीकारल्या जात असून बेस्टला हा निर्णय फायद्याचा ठरला आहे. कारण तीन दिवसात बेस्टच्या महसुलात मोठी भर पडली आहे. 8 नोव्हेंबर रोजी बेस्टने 1406 नवीन पास वितरीत केले असून 7881 पास नुतनीकरण केले आहेत. 288 पास अपग्रेड केले आहेत. यातून बेस्टला 66, 43, 260 रुपयांचा महसुल मिळाला आहे. तर 9 नोव्हेंबर रोजी 4815 पासच्या नुतनीकरणासह 1029 नवीन पास वितरीत केले आहेत. तर 119 पास अपग्रेड केले आहेत. यातून 40, 69, 860 रुपये महसुल मिळाला आहे. 10 नोव्हेंबरला 1083 नवीन पासच्या वितरणासह 7275 पासचे नुतनीकरण केले आहे. तर अपग्रेड केलेल्या पासचा आकडा 156 आहे. यातून बेस्टला 60, 75, 240 रुपयांचा महसुल मिळाला आहे. या तीन दिवसाच्या काळात पास आणि पास नुतनीकरणातून बेस्टला एकूण 1, 67, 88,360 रुपयांचा महसुल मिळाला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा