पंतप्रधानांच्या 'बेस्ट' आयडियामुळे मालामाल

 Pali Hill
पंतप्रधानांच्या 'बेस्ट' आयडियामुळे मालामाल

मुंबई - नोटा रद्द करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयामुळे आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट प्रशासनाला मात्र चांगलाच फायदा होतोय. बेस्टच्या वीज बिल भरणा केंद्राद्वारे 500, 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जातायेत. वीज बिलाच्या माध्यमातून बेस्टच्या तिजोरीत मोठी भर पडतेय. दररोज अडीच ते तीन कोटीची रक्कम बिलाच्या रूपानं बेस्टकडे जमा होतेय. शुक्रवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत 10 कोटी रुपये बेस्टकडे जमा झालेत. हा फायदा लक्षात घेता बेस्टनं शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत वीज बिल भरणा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय.

Loading Comments